शिवाजी महाराज जयंतीसाठी करावयाच्या गोष्टी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
|Shivjayanti , shivaji maharaj, chhatrapati shivaji maharaj,shivaji,shivaji maharaj jayanti,song,shiv jayanti,shivaji jayanti,shivaji maharaj story,maharaj,shivaji maharaj whatsapp status ,shivaji maharaj jayanti,chhatrapati shivaji maharaj status ,shivaji maharaj jayanti latur|
|शिवाजी महाराज जयंतीसाठी करावयाच्या गोष्टी| महाराष्ट्र सरकारने २००१ साली [शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०] ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.[२] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.
शिवजयंतीला कोणी सुरुवात केली ?
इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य घरांघरांत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली. ही पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूत करण्याचे काम केले. पुढे २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
शिवाजी महाराज जयंतीसाठी करावयाच्या गोष्टी :
शिवजन्म उत्सव १९ फेब्रुवारीलाच साजरा करावा. जगाला इंग्रजी कॅलेंडर कळते. शिवजन्म उत्सव जागतिक करण्यासाठी १९ फेब्रुवारी हाच एकमेव पर्याय. तिथी नुसार शिवजन्म उत्सव केल्यामुळेच आज पर्यंत हा सण महाराष्ट्रा बाहेर जाऊ शकला नाही.
शिवजन्म हा आपला राष्ट्रीय सण आहे. मुलांना आणि घरातील लोकांना शिवजन्म उत्सवा निमित्त नवीन कपडे खरेदी करून आनद व्यक्त करा.
गृहप्रवेश, वाहन खरेदी आणि नवीन उपक्रम, चांगल्या कामाची सुरुवात शिवजन्म ह्याच दिवशी करावी.
शिवजन्म उत्सवा निमित्त मित्रमंडळी स्नेही यांना भेट म्हणून शिव चरित्रावरील पुस्तक, शिवप्रतिमा ध्यावी.
शिवजन्म उत्सवा निमित्त व्याख्यानमाला, किर्तन, प्रवचन, पोवाडे, इत्यादी कार्यक्रम ठेऊन शिवचरित्राचे पारायण करावे.
घरावर भगवा जरीपटका लावावा.
शिवजन्म उत्सवा निमित्त विविध स्पर्धा खेळ, मर्दानी खेळ, किल्ले चढाई, किल्ले बांधणी अशाच स्पर्धा आयोजित कराव्या.
दसऱ्याला नवरात्रीत शस्त्रपूजनाबरोबर शिवप्रतिमा, जिजाऊप्रतिमा, पूजन आवर्जून करावे.
शिवाजी महाराज जन्माला यावेत असे मनापासून वाटत असेल तर मुलांना आणि घरातील सर्व मंडळीना दर वर्षी किमान एक तरी नवीन किल्ला दाखवावा. दरवर्षी किमान एक तरी नवीन पुस्तक वाचायला ध्यावे.
No comments:
Post a Comment