वि स खांडेकरांचे सर्वश्रेष्ठ विचार VII
जगात तीनच गोष्टी खऱ्या आहेत,मध्य मृगया, मीनाक्षी या तिन्हींच्या सहवासात मनुष्य आपली सर्व दु:खे विसरतो.
या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल,त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे.
पवित्र, सुंदर, निष्पाप हे दुबळ्या सज्जनांनी निर्माण केलेले नुसते शब्द आहेत.
पवित्र यज्ञकुंड ही बळी दिल्या जाणाऱ्या पशूची चिता आहे.
सुंदर स्त्री ही वासनेची क्षणिक तृप्ती करणारी एक सजीव बाहुली आहे.
प्रेमाला कधीही कसलीही भीती वाटत नाही.
जो स्वतःचा धर्म पाळतो त्यालाच दुसऱ्यांन आपला धर्म पाळावा अशी अपेक्षा करण्याचा अधिकार असतो.
मुद्सद्दी माणसे घोरपडीसारखे असतात, आपल्या मुद्याला चिटकून राहण्यात ते कुणालाही हार जात नाहीत.
प्रीती, ममता, वात्सल्य, हे सारे जगातील मुखवटे आहते.मनुष्य फक्त स्वतःच्या सुखासाठी जगतो, केवळ आपल्या अहंकाराच्या तृप्तीसाठी जगतो.
व्यसनात बुडलेली माणसे पिशाच्यापेक्षाही भयंकर असतात.
क्षुद्र मोहांना क्षुद्र माणसचं बळी पडतात.
क्षमा माणसाच्या पहिल्या अपराधासाठी असते. निर्ढावलेल्या गुन्हेगार साध्या शिक्षेने सुधारत नाही.
स्वतःसाठी जगण्यात जेवढा आनंद आहे, त्याच्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगण्यात दुसऱ्यासाठी मरण्यात शतपटीने अधिक आनंद आहे.
फुलांचा सुगंध डोळ्याने दिसत नाही; पण तो नाकाला कळतो. आत्माही त्या सुगंधासारखाच आहे.
गुरुनिंदा हे पाप आहे,पण सत्य लपवून ठेवणं हे त्याहूनही मोठं पाप आहे.
मानवतेला सुखी व्हायचं असेल, तर मानवानं प्रथम आपल्या मनावर विजय मिळविला पाहिजे.
No comments:
Post a Comment