नियोजन म्हणजे काय? What is Planning?
नियोजन म्हणजे काय? |
नियोजन हा शब्द इतका आपल्या सर्वांच्या परिचयाचा असतो की त्यामुळे आपण त्याच्या अर्थाकडे पाहण्याची तसदीच घेत नाही. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना विचारून पाहिलं तर ९५% लोकांना याचे उत्तर देता येणार नाही आणि ज्या ५% लोकांना याचे उत्तर माहिती आहे त्यातील आणखी फक्त ५% लोकच यशस्वी झालेले दिसतात.कारण नुसतेच नियोजन म्हणजे काय हे सांगून भागत नाही तर ते अंमलात आणले तरच त्याचा उपयोग स्वप्नात वाघ मारला म्हणून कोणी शूर होत नाही किंवा स्वप्नात विमानात बसले म्हणून कोणी उड्डाण करीत नाही तसेच नियोजन हा शब्द अंमलबजावणी शिवाय व्यर्थ ठरतो. तर आता आपण पाहणारच आहोत की नक्की नियोजन म्हणजे काय आणि ते कसे केले जाते.
नियोजन म्हणजे काय
तर अशी तयारी जी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करते की आपण कोठे जायचे आहे आणि कसे जायचे आहे याची सुरुवात होते ती आपण कोठे आहोत येथून . म्हणजेच काय तर नियोजन म्हणजे एक अशी कृती जी एका पुलाप्रमाणे आहे दोन गोष्टी जोडते एक तुम्ही कोठे आहात आणि दुसरे म्हणजे तुम्ही कोठे जाणार आहात.
नियोजनाची काही मान्यवरांनी केलेल्या व्याख्या पहा.
Planning is deciding in advance what to do, How to do, When to do, Who to do, is to do it - Koontz and O. Donnell
या व्याखेचा साधा अर्थ असा की आपण अगोदरच याचा निर्णय घायचा की ते विशिष्ट कोणते काम करायचे आहे, कसे करायचे, कधी करायचे आहे आणि ते कोण करणार आहे.
थोडक्यात काय तर काम ठरवायचे , ते काम कोणी करायचे , कसे करायचे आणि कधी करायचे हे Advance मध्ये ठरविणे म्हणजेच नियोजन.
नियोजन म्हणजे काय? नियोजनाच्या काही प्रसिद्ध व्याख्या पहा.
- Planning is the process of thinking about the activities required to achieve the desired goal.
- Planning is the fundamental management function, which involves deciding beforehand, what is to be done, when is it to be done, how it is to be done and who is going to do it. It is an intellectual process that lays down an organization’s objectives and develops various courses of action, by which the organization can achieve those objectives. It chalks out exactly, how to attain a specific goal.
- Planning is the act of researching, analyzing, anticipating and influencing change in our society.
- Planning is considered the first primary function of management. In this function, managers define the organizational goals and allocate resources of the organization to achieve such goals. So planning will also define all the future functions of management.
- Planning is the process of establishing goals and suitable course of action for achieving these goals - James Stoner
नियोजन म्हणजे काय तर आपले ध्येय ठरविण्याची एक प्रक्रीया आणि ते ध्येय साध्य करण्याचे मार्ग ठरविणे अर्थात Suitable मार्ग. नियोजन केल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजेच आपल्याला आपले ध्येय ठरविता येते म्हणजेच कोणत्या गावाला जायचे आहे. कुठले ठिकाण फिरण्यासाठी योग्य आहे त्याची सगळी तयारी याचा निर्णय होतो आणि मग आपोआप पुढची पायरी येते की कोणी जायचे , कसे जायचे आणि केव्हा जायचे.
उदाहरणार्थ :
दिल्ली येथे जायचे मग कोण जाणार ती व्यक्ती निवडा. मग कसे जायचे बस , रेल्वे , विमान की खाजगी वाहन आणि मग हेही ठरवायचे की केव्हा निघायचे अर्थात हे सगळे ठरविल्यानंतर गाडी चुकणार नाही आणि बाकीचे पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. कारण नियोजन केल्यामुळे कोणती गाडी कुठे , किती वाजता येते हे ही तुम्ही लक्षात घेऊनच बाहेर पडत असता .
ही प्रक्रिया जरी वाटायला सोपी तरी चालायला अवघड ठरते. कारण यातला एक जरी घटक इकडे तिकडे झाला तर सगळी मेहनत गेली पाण्यात, सगळ्याच मातीमोल होईल. आणि तसे होऊ नये म्हणून काय दक्षता घाव्यात ते आपण पुढच्या भागात पाहुयाच.
चांगला plan नियोजन कशाला म्हणतात ते पाहणारच आहोत आपण. Essentials of Good Plan. म्हणजे नियोजन करताना घ्यावयाच्या दक्षता.
No comments:
Post a Comment