Thoughts that Inspired Everyone

Breaking

Find us on Facebook

Find us on Facebook
Visit our facebook page

Tuesday, January 21, 2020

वि स खांडेकरांचे अमृतवेल कादंबरीतले गोड विचार

वि स खांडेकरांचे अमृतवेल कादंबरीतले गोड विचार 


मागच्या मालिकेत आपण विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या ययाती ह्या कादंबरीतील सर्वोत्तम विचार Best Quotes From yayati books  हे बघितले. 


Bolka Sparsh


आज आपण विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या अजरामर पुस्तकांपैकी एक पुस्तक "अमृतवेल" ह्या पुस्तकातील वि स खांडेकरांचे  Best Quotes  सर्वोत्तम विचार पाहणार आहोत. 

विष्णू सखाराम खांडेकर ह्याचं अमृतवेल ही कादंबरी कुणालाही प्रेमात पाडेल अशी आहे. प्रेम म्हणजे काय आणि जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य आपआपल्या परीनं कोणत्या ना कोणत्या वासनेने  शापित असतो. हे स्पष्ट केल आहे. मला हे पुस्तक वाचताना खांडेकरांचे काही अशे शब्द आणि वाक्य जे मनाला भिडतात आणि आपल्या आयुष्याशी मिळतेजुळते असतात ते मी आपल्यासमोर घेऊन येत आहे, तर मग चला बघूया वि स खांडेकरांचे अमृतवेल मधील मला आवडलेले गोड विचार . 

Amrutvel Novel Quotes in Marathi 


वि स खांडेकरांचे अमृतवेल कादंबरीतले गोड विचार 



स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे, पण माणसाच मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दु:ख साहून नवी स्वप्न पाहण्यात आहे.हालाहाल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे. 


आपण सदैव आत्मकेंद्रित असतो. नेहमी केवळ स्वतःच्याच सुख-दुःखाचा विचार करतो, त्यामुळं आपलं दु:ख आपल्याला फार-फार मोठ वाटत राहत ! 


एखाद्या वेळी दुर्दैव जाता जाता आपल्याला धक्का देऊन जात. त्या धक्क्यात मनाचा तोल जातो. 


विरोधाभास अलंकाराच अतिशय उत्कृष्ट उदाहरण कोणतं असं जर मला कोणी विचारलं तर मी चटकन उत्तर देईन - मनुष्य. 


माणसाच्या मनात जशी उच्रुंखल आसक्ती आहे. तशी उदात्त विरक्तीही आहे. 


मनुष्य एकरंगी नाही. त्याचा खरा संघर्ष ईश्वराशी नाही.समाजाशीही नाही; तो स्वतःशीच आहे. 


प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे, या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते , तेव्हाच प्रीतीही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमलते, मैत्री फुलते. 


मनुष्य जेव्हा-जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा -तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. 


निरपेक्ष प्रेम केल्यानेच प्रीतीचा अर्थ समजतो. 


अंतरीचा ओढीनं जो दुसऱ्याच दु:ख वाटून घेईल , त्यालाच प्रीती हा मानवाच्या शापित जीवनाला देवानं दिलेल्या एकुलता एक वर आहे, याची प्रचीती येईल. 


आयुष्यात ज्याला त्याला आपआपल्या पावूलवाटेने पुढ जावं लागतं. 


पुस्तकाचं जग सुंदर असत , यात शंका नाही ; पण खरीखुरी सुखदु:ख भोगताना पुस्तकी मलमपट्ट्यांचा काही उपयोग होत नाही. अशा वेळी हवा असतो मायेचा स्पर्श आतून उचंबळून येणाऱ्या आपुलकीचा आधार. 


या जगावर सत्ता चालते, ती अंध, अधुरी, आसुरी वासनेची. डोळस, दैवी भावनेची नाही. 


मनुष्य सुखानं जगू शकतो , तो धुंदीत मग ती धुंदी कसलीही असो ! 

श्रीमंताच्या घरी कान असून ऐकायचे नसते, आणि डोळे असून पहायचे नसते , आणि तोंड असून बोलायचे नसते. 

उन्हाळ्यात नद्या आटतात, हिवाळ्यात त्या गोठून जातात, पण समुद्र कधीच आटत नाही , कधीच गोटत नाही. 

कुणीही मनुष्य असो, मृत्यू हा जेव्हा त्याला मित्र वाटू लागतो , तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्या मायेने त्याला मागे ओढले पाहिजे. माणसाचे माणसाशी असलेले हे सर्वात निकटचे नाते आहे. 

किती विचित्र आहे हे जग ! घरच्या माणसांची किंमत कळायलासुद्धा घराबाहेर पडाव लागत इथ.

मध्यरात्रीच्या एकांतात मोठे मानुससुद्धा लहान मुलांसारखे भित्रे होते. 

जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे, दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे , त्याचे जीवन फुलावे, म्हणून त्याच्यासाठी जे-जे- करता येईल , ते-ते- करणे. 

जगात दोन जाती आहेत माणसांच्या. एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड मनांची.    

आपलं घरट सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही. 

चपळ घोड्यावर मांड ठोकून बसणारा कुणी तरी असावा लागतो. तसा स्वार नसला, की घोडा उधळतो. 

जर आणि तर ! मनुष्य हा किती आशाळभूत प्राणी आहे. हे सिद्ध करण्यापलीकडे या शब्दांचा काही उपयोग नाही. 

वाघ सिहांशिवाय सर्कस नाही - उद्दाम वासनांशिवाय मनुष्य  नाही. 

कल्पनेची नशा दारूपेक्षाही लवकर चढते. 

माणसाच खर खर स्वरूप फार ओंगळ असत ! 

माणूस किती दीर्घद्वेषी असतो! मृत्युनंतरसुद्धा त्यांची सुडाची इच्छा जिवंत राहते. 

No comments:

Post a Comment