१५ + मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रेरक विचार
|motivation|,|motivational|,|best motivation|,|2020 motivation|
15 + Best Motivational Quotes in Marathi
वेगवेगळी पर्यायी उत्तरे शोधताना आपल्याला कोणते ध्येय किंवा हेतू साध्य करावयाचा आहे हे लक्षात घेऊनच पुढचा विचार करायचा आहे.
चांगले व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक गुणवत्तेची बेरीज.
आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर एकच गोष्ट करा, प्रचंड ज्ञान संपादन करून आपली बुद्धी एकदम तेज धारधार करून ठेवा. आणि सतत तिला धार लावत रहा.
आयुष्यात फक्त हार देत आणि घेत राहिलात तर आयुष्यात फक्त हारच पाहायची वेळ येईल.
जगातील बरीच श्रीमंत माणसे पदवीधारक नाहीत, परंतु ते पदवीधारक लोकांना कामाला ठेवतात.
शिकलेली माणसं पैशासाठी काम करतात आणि श्रीमंत माणसं बुद्धीने काम करून पैसा मिळवतात. व त्याच पैशातून पगारी माणसं कामाला ठेऊन आणखी श्रीमंत होतात.
ज्याच्याकडे बुद्धिमत्ता त्याच्याकडे पैसा आणि सत्ता.
बुद्धिमत्तेचा कमाल उपयोग करून कमाल यश मिळवा हीच तुमची श्रीमंती ठरू शकते.
कोणतेही अडचण , संकट, संधी आली की कोणीही न सांगता जेव्हा तुम्ही बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढाकार घेऊन निर्णय घेता त्या क्षमतेला म्हणतात Initiative.
आयुष्यात नेता व्हायचं असेल तर पुढाकार घ्यायला शिका तशी तयारी करा.
जेवढा मोठा पुढाकार घेण्याची ताकद दाखवाल तेवढी मोठी नेतृत्वाची संधी लोक तुम्हाला देत राहतील.
लक्षात ठेवा, संधीने तुमचे दार ठोकावे असे वाटत असेल तर आधी दरवाजा तयार करा आणि तो संधी मिळविण्यासाठी सताड उघडा देखील ठेवा.
ज्याला यशस्वी व्हायचं असत , त्याच्या डोक्यात नेहमी नवीन नवीन विचार, संकल्पना, कल्पना युक्ती याच वादळ फिरत राहिलं पाहिजे.
दुसऱ्यांच्या तंगड्या ओढून आपले हात मजबूत होतील. परंतु पाय नाही आणि जगात सन्मानानं उभ राहण्यासाठी पुढे जाण्यासाठी पाय लागतात हेच लक्षात ठेवा.
Best Motivational Quotes in Marathi
आपल्या नेतृत्वाचा सूर्य कर्तुत्वाच्या क्षितिजावर तळपवायचा असेल तर आत्मविश्वास रुपी सूर्यमाला डळमळीत होऊ देऊ नका.
वाटेल ते कष्ट उपसा वाटेल ती किंमत मोजा परंतु आपल्या धैर्यापासून ध्येयापासून ढळू नका.
एकवेळ आपण संपलो तरी हरकत नाही पण आत्मविश्वास ढळू देऊ नका.
No comments:
Post a Comment