शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचे सविस्तर मार्गदर्शन खालीलप्रमाणे आहे
 |
Photo credit - Google
|
मार्केटबद्दल बेसिक समज समजून घ्या
शेअर म्हणजे काय?
शेअर म्हणजे कंपनीतील एका छोट्या भागावर मालकी हक्क. जेव्हा पण तुम्ही कोणत्या कंपनी मध्ये तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही कंपनीचा एक छोटा भागधारक बनता.
डिव्हिडंड (लाभांश):
काही कंपन्या शेअरधारकांना त्यांच्या नफ्यातून लाभांश देतात.
इंडेक्स (सूचकांक):
BSE चा सेन्सेक्स आणि NSE चा निफ्टी 50 हे प्रमुख इंडेक्स आहेत, जे मार्केटची स्थिती दर्शवतात.
डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट कसे उघडायचे?
तुम्हाला स्टॉक मार्केट मध्ये इन्वेस्ट करण्यासाठी एक मिडियम ची गरज असते आणि तो मिडियम एक ब्रोकर आहे. जसा तुम्हाला घर घ्यायच असेल तर तुम्ही रीयल इस्टेट दलाल ह्याच्याशी संपर्क साधता तसंच स्टॉक मार्केट मध्ये इन्वेस्ट करण्यासाठी ब्रोकर ची गरज असते.
ब्रोकर निवडा
भारतामध्ये प्रसिद्ध असे खूप स्टॉक ब्रोकर आहेत त्यामधले काही Zerodha हा ऑनलाइन फॅसिलिटी साठी प्रसिद्ध आहे. 5paisa हा सुद्धा प्रसिद्ध असा ऑनलाइन आणि रीटेल साठी प्रसिद्ध आहे. सध्या चर्चेत grow ब्रोकर सुद्धा आहे.
Link to Open Broking Account
Zerodha
5Paisa
Demat Account - Demat अकाऊंट हे तुमच्या ब्रोकर थ्रू उघडले जाते आणि खूप अनिवार्य आहे. तुम्ही कोणत्या ही शेअर ची देवाण घेवाण करता ही तुमच्या demat मध्ये असते. जस बँकेत saving अकाऊंट ओपेन केल जात तस ब्रोकर कडे demat अकाऊंट ओपेन केल जात.
Trading Account - ट्रेडिंग अकाऊंट ची गरज का असते? तुम्हाला जर शेअर ची देवाण घेवाण करायची असेल तर ट्रेडिंग अकाऊंट ही अनिवार्य आहे. तुम्ही कोणते शेअर घ्यायची असतील तर ट्रेडिंग अकाऊंट थ्रू घेऊ शकता आणि ते शेअर तुमच्या Demat अकाऊंट मध्ये save होते.
डॉक्युमेंट्स तयार ठेवा
तुम्हाला ऑनलाइन अकाऊंट चालू करायच असेल तर तुम्हाला , आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक/स्टेटमेंट, पासपोर्ट साइज फोटो आणि सिग्नेचर ह्या गोष्टी जरूर लागतील. ऑनलाइन अकाऊंट ओपेन करण्यासाठी तुमचा रजिस्टर नंबर आधार कार्ड ला लिंक होण आवश्यक आहे. तुम्हाला जर तुमचे डॉक्युमेंट्स ऑटो अपलोड करायचे असतील तर तुम्ही डिजिलोकर च्या मदतीने पण अकाऊंट ओपेन करू शकता.
गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करा
कंपनीचे फंडामेंटल्स तपासा
कोणत्याही कंपनी मध्ये गुंतवणूक करण्या अगोदर त्या कंपनीचे वार्षिक नफा, कर्ज, व्यवस्थापनाची गुणवत्ता, आणि उद्योगातील स्थिती समजून घ्या. कंपनीचे महत्वाचे रेशियो जाणून घ्या. फंडामेंटल इणवेसटमेंट ही जास्त काळासाठी करा.
शेअरचा तांत्रिक अभ्यास
सध्याच्या काळात सर्वाना Technical अभ्यास करण्यात रुचि असते, म्हणजे सर्वाना शॉर्ट टर्म साथी इन्वेस्ट करायच आहे. कोणाला long term साठी इन्वेस्ट नाही करायच. थोड्या काळाच्या गुंतवनिकीसाठी टेक्निकल अभ्यास खूप महत्वाच असतं. किमतीचा इतिहास, चार्ट पॅटर्न्स, सपोर्ट-रेझिस्टन्स ह्यासाठी समजून घ्या.
पहिल्या गुंतवणुकीसाठी टिप्स
थोड्या प्रमाणात सुरुवात करा
जेव्हा पण तुम्ही कोणत्या क्षेत्रात नवीन असता तेव्हा तिथे जपून आणि बुद्धीने काम केलेल कधीही हिताच ठरत.
तसंच गुंतवानिकीच्या वेळेला स्टॉक मार्केट मध्ये छोट्या अमाऊंट ने इन्वेस्ट करा, 5 ते 10 हजार या सारख्या लहान रकमेणे इन्वेस्ट करा. तुमच्या मेहनतीचा पैसा आहे.
ब्लू-चिप कंपन्या निवडा
सुरुवातीच्या काळात कोणत्या ही अफवेवर इन्वेस्ट करू नका, स्टॉक मार्केट मधील मोठ मोठ्या ब्ल्यु चिप म्हणजे लार्ज क्याप कंपनी मध्ये इन्वेस्ट करा ज्या nifty आणि सेंसेक्स इंडेक्स मध्ये आहेत, जस की टाटा, रिलायन्स, एचडीएफसी बँक यांसारख्या मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.
SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)
स्टॉक मध्ये सिप करून दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून शेअर बाजारातील चढ-उतार कमी करू शकता.
गुंतवणूक प्रकार समजून घ्या
इंट्राडे ट्रेडिंग (Intraday Trading)
Intraday Day ट्रेडिंग म्हणजे एका दिवसात शेअर ची देवाण घेवाण करणे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही रिलायन्स चे 10 शेअर सकाळी मार्केट चालू होताना घेतले आणि ते मार्केट बंद होण्याच्या अगोदर विकले त्याला इंट्राडे म्हणतात.
लाँग टर्म गुंतवणूक
काही वर्षांसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर असते. एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी केलेल्या गुणवणीकिला लॉन्ग टर्म इणवेसटमेंट बोलतात.
डायव्हर्सिफिकेशन
डायव्हर्सिफिकेशन म्हणजे एकाच शेअर मध्ये गुणतुवणूक न करता वेगवेगळ्या सेक्टर मध्ये नाही तर वेगवेगळ्या कंपनी मध्ये एकसाठी केलेल्या इनवेसटमेंटला डायव्हर्सिफिकेशन बोलतात.
महत्त्वाचे नियम पाळा
जोखीम व्यवस्थापन
तुमच्या गुंतवणुकीपैकी 5-10% रक्कम उच्च जोखमीच्या गुंतवणुकीसाठी ठेवा.
इमोशनल निर्णय टाळा
बाजार चढ-उतारांनी घाबरून निर्णय घेऊ नका, पेशन्स ने निर्णय घ्या. कंपनी कितीही चांगली असेल नाहीतर नावाजलेली असेल पण तिचे perfomance करत नसेल तर त्या कंपनी मधून आपली इणवेसटमेंट काढून घ्या.
स्टॉप-लॉस वापरा
तोट्याची मर्यादा सेट करा, ज्यामुळे मोठा तोटा होण्यापासून बचाव होतो. स्टॉप लॉस हा इंट्राडे करतात त्या साथी खूप महत्वाचा आहे.
नियमितपणे सुधारणा करा
बाजाराच्या बातम्या वाचा
आर्थिक घडामोडी, रिझर्व्ह बँकेचे निर्णय, आणि जागतिक बाजारातील घडामोडींचा अभ्यास करा.
तज्ज्ञांचे सल्ले घ्या
ब्रोकरकडील विश्लेषण व रिपोर्ट वाचा, फक्त न्यूज चॅनल वरचे सल्ले ऐकू नका स्वता विश्लेषण करा.
कोणती चूक टाळायची?
- अफवा किंवा टिप्सवर विश्वास ठेवू नका.
- शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करू नका.
- तुमचे सर्व पैसे शेअर बाजारात गुंतवू नका.
तुमच्यासाठी काही साधी गुंतवणूक
Mutual Funds शेअर बाजार समजून घेण्याआधी म्युच्युअल फंडद्वारे सुरुवात करा. म्यूचुअल फंड बद्दल जाणून घेण्यासाठी
संपर्क करा.
ETFs (Exchange-Traded Funds): हे कमी खर्चिक आणि सुरक्षित पर्याय आहेत.
No comments:
Post a Comment