पाऊसधारा
पावसाची रट
वाऱ्याचा कट
दोघांच्या एकसंधाने
सृष्टी झाली जलमय।।
सकाळच्या पाहऱ्यात
धुख्यांच्या दराऱ्यात
संपूर्ण दिवस झाला अंधारमय।।
डोंगरदऱ्यातील वाजला सूर
नदी नाल्यांना आला पूर।
पडती धबधबे जणू दुधाचे झरे
हिरव्यागार दृश्यात लखलखती वने।।
गळत्या घरातील त्रासिक मने
देऊ लागली पावसाळा शिव्याशाप ।
तर काही आनंदी मनांतील घरे
गाऊ लागले पावसाची गाणी अमाप।।
No comments:
Post a Comment