Best Quotes of V.S Khandekar in Amrutvel Novel
विष्णू सखाराम खांडेकर ह्याचं अमृतवेल ही कादंबरी कुणालाही प्रेमात पाडेल अशी आहे. प्रेम म्हणजे काय आणि जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य आपआपल्या परीनं कोणत्या ना कोणत्या वासनेने शापित असतो. हे स्पष्ट केल आहे. मला हे पुस्तक वाचताना खांडेकरांचे काही अशे शब्द आणि वाक्य जे मनाला भिडतात आणि आपल्या आयुष्याशी मिळतेजुळते असतात ते मी आपल्यासमोर घेऊन येत आहे.
मागच्या मालिकेत आपण विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या ययाती ह्या कादंबरीतील सर्वोत्तम विचार Best Quotes From yayati books हे बघितले.
आज आपण विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या अजरामर पुस्तकांपैकी एक पुस्तक "अमृतवेल" ह्या पुस्तकातील वि स खांडेकरांचे Best Quotes सर्वोत्तम विचार पाहणार आहोत, तर मग चला बघूया वि स खांडेकरांचे अमृतवेल मधील मला आवडलेले गोड विचार .
Best Quotes of V.S Khandekar in Amrutvel Novel
विष्णू सखाराम खांडेकर ह्यांचे अमृतवेल कादंबरी मधील विचार
माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटतात ; नवे निर्माण होतात; पण या नव्या- जुन्या धाग्याचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावे लागते. जीवनाला अर्थ येतो तो या गुंफणीतल्या कलेमुळे, गोफातल्या नाना रंगाच्या धाग्यांमुळे.
कोणत्याही कारणाने एकत्रित येणाऱ्या स्त्री पुरुषाकडे पाहण्याची शिकल्या- सवरल्या लोकांच दृष्टीसुद्धा निर्मळ नसते.
गरिबीमुळ माणूस मिंधा बनतो. हे मिंधेपण त्याची जीभ कापून टाकत! त्याला पापाशी तडजोड करायला लावत.
अनेक ओढे मिळून नदी बनते. माणसाची प्रत्येक भावनाही तशीच असते. संमिश्र, अनेकपदरी , आत्मप्रीतीपासून आत्मलोपापर्यंत सर्व छटांनी रंगलेली.
माणसाच्या वेवेकशक्तीपेक्षा त्याचे मनोविकार किती बलवत्तर असतात.
बहुतेक माणसं थोड्या - फार प्रमाणात गुन्हेगार असतात! फरक एवढाच की एखाद्याच्या गुन्ह्यांची चौका-चौकात दवंडी पिटली जाते ; दुसऱ्याच्या गुन्ह्यांची या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही.
माणूस कितीही दु:खी असो, रोगी असो, दरिद्री असो, त्याच खर प्रेम असत एका गोष्टीवर - जगण्यावर.
शरीरसुख हा नवरा - बायकोंच्या मनाची जुळणी करणारा एक नाजूक दुवा असतो.
शरीरसुखाऐवजी पतीपत्नींना परस्परांच्या सहवासाच्या आणि सहानभुतीची सदैव गरज असते.
पाप करणाऱ्यांना हुशार वकील आणि डॉक्टर यांचा मोठा आधार असतो.
पैशामुळ पाप पचतात; पण मनं कुजतात.
वासना अंधळी असते ; तिला कर्तव्य कधीच दिसत नाही.
अंगात ताप असेपर्यंत मनुष्य बडबडत राहतो. ताप उतरला की त्याला थकवा येतो. स्वस्थ पडून राहावंसं वाटतं.
आयुष्यात फुलायचं असत ; जाळायचं असत ; कुजायचं नसतं.
स्वतःची वकीली कशी करावी , हे ज्याला त्याला उपजतच समजते.
मनुष्य एकदा माणुसकीपासून ढळला, की तो नुसता पशु होत नाही ; तो राक्षस बनत जातो.
माणसाला सदैव लहान राहता येत नाही ! वयाबरोबर त्याच्या शरीराच्या आणि मनाच्या भुका वाढत जातात.त्या तृप्त करण्यासाठी कुठल्या तरी वाटेने त्याला पुढे जावेच लागतेय.या वाटचालीत वळणावळनाला नाना प्रकारचे मोह दबा धरून बसलेले असतात. ते सारे टाळून पुढे जाने हे सामन्य माणसाच्या दृष्टीने काही सोपे काम नाही.
आपल्या आयुष्याची मनासारखी घडण करायला या जगात माणूस मोकळा आहे कुठे? तो कधी दैवाचे, तर कधी समाजाचे खेळणे होतो; कधी स्वतःच्या , तर कधी इतरांच्या मनोविकारांच्या भक्ष्यस्थानी पडतो. त्याला कधी पूर्वजांच्या तर कधी स्वतःच्या पापाचे प्रायश्चित भोगावे लागले. बिचारा जन्माला येतो, तोच मुळी वासनांच्या चक्रव्यूहात सापडून.
एका पापाच्या पोटी हजार पापे जन्माला येतात.
माणसानं आपलं मत कुठही गुंतू देऊ नये, हे चालू जगाच तत्वज्ञान आहे.
स्वतःवर प्रेम करता -करता माणूस शेवटी स्वतःच्या शुद्र सुख-दु:खांचा कायमचा कैदी होऊन जातो.
प्रेम हा सौदा नाही. ते ईश्वरी वरदान आहे. प्रकाशासारख , पावसासारखं !
प्रेमात पडणारा वासनेच्या भोवऱ्यात सापडतो, नाही तर भावनेच्या पुरात वाहत जातो.
व्यसनी मनुष्य शरीराचा गुलाम होऊन बसतो.
लोकगंगेच्या कल्पनेत चिखल फार , पाणी थोड असत.
मनस्वी माणसाच्या अश्रूंत जग बदलून टाकण्याचं सामर्थ्य असत.
दु:ख ही दोन हृदयांना जोडणारी सर्वात जवळची वाट आहे.
मनुष्य स्वभावतः शुद्र आहे; स्वार्थी आहे; अहंकारी आहे; सुखलोलुप आहे; नाना प्रकारच्या वासनानांनी बरबटलेला आहे.
जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य आपआपल्या परीनं शापित असतो.
जिवलग माणसाशी मन उघडं करून बोलता येऊ नये. असे ! अशा प्रंसगी जिथ कसलाही आडदापडदा नसतो, तिथ आभाळाला भिडलेली भिंत उभी राहते! आतले कढ आतच खदखदू लागतात.
निसर्गाने माणूस मातीचा घडविला आहे. पण मातीच्या या भंगुर पुतळ्याला त्यानं प्रकाशाचे अमर पंख दिले आहेत.
No comments:
Post a Comment