Thoughts that Inspired Everyone

Breaking

Find us on Facebook

Find us on Facebook
Visit our facebook page

Thursday, December 26, 2019

12 + BEST QUOTES OF V S KHANDEKAR IN MARATHI - II

वि. स.खांडेकर ह्याची  सर्वोत्तम शब्दरचना 





BEST QUOTES OF V S KHANDEKAR IN MARATHI 




Bolka Sparsh






BEST V S KHANDEKAR QUOTES IN MARATHI  
नमस्कार मित्र मंडळी मला कोणतेही पुस्तक वाचताना सोबत वही पेन हा लागतोच,  कारण पुस्तकामधील मला आवडलेली वाक्य आणि काही पंक्ती मला माझ्या वहीमध्ये लिहायची खूप आवड आहे.  आणि  आज आपण त्यातलेच  काही शब्दवाक्य बघणार आहोत, आजच्या ह्या ब्लॉग  मध्ये आपण ( BEST V S KHANDEKAR QUOTES IN MARATHI )   वि स खांडेकर ह्याचे मला आवडलेली शब्द्वाक्य आणि शब्दरचना मी तुमच्या बरोबर सामायिक करणार आहे आवडल्यास नक्की टिपणी द्या. 





BEST V S KHANDEKAR QUOTES IN MARATHI   

वि स खांडेकरांची  ययाती ह्या कादंबरी मधील मी सुरु केलेली मालिका विष्णू सखाराम खांडेकर ह्याचे विचार  ह्यामध्ये  मी विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या काही पुस्तकातील  आणि प्रेरित केलेलं मुद्दे, वाक्य जे मला आवडलेत तेच मी तुमच्यासमोर सादर करत आहे. 
सध्याची मालिका पूर्णता "ययाती " ह्या पुस्तकावर आधारित आहे. मी वाचलेलं सर्वात पहिलं आणि मला माझ्या जीवनात आवडलेलं सर्वात पहिलं पहिलं पुस्तक म्हणजे " ययाती "





मी  सुरु केलेली विष्णू सखाराम खांडेकर सर ह्याच्या विचारांच्या शब्दरचनाची  मालिका सुरु केली आहे. इथे तुम्ही  वि.स.खांडेकर ह्यांची प्रसिद्ध वाक्य  > Quotes  पाहणार आहोत. 





आज आपण ययातीमधील विष्णू सखाराम खांडेकर लिखित चारित्र्य "ययाती" ह्या चरित्राचे असे संवाद जे मला आवडले आहेत ते मी इथे तुमच्या बरोबर सामायिक करत आहे. आवडल्यास नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा. 






वि. स.खांडेकर ह्याचे सर्वोत्तम शब्दरचना 





"शेजाऱ्यासारखा दुसरा शत्रू नाही "


"प्रत्येक लोकप्रिय उक्तित केवळ अर्धसत्य असत ."



"जीवन हे सुंदर आहे, मधुर आहे, पण त्याला केव्हा कीड लागेल याचा नेम नाही." 



"कुठल्याही गोष्टीचे मोल ती हरल्यानंतरच आपल्याला कळते."




"धर्माचे उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही, पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद त्यागाचा आहे. "







Bolka Sparsh






"शरीरसुख हा काही मानवी जीवनाचा मुख्य निकष नाही, तो निकष आहे आत्म्याच समाधान. "



"मृत्यू हे मोठे भयंकर अस्वल आहे. कितीही उंच झाडावर चढून बसले,तरी तिथे ते माणसाचा पाठलाग करते."




"लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही,सत्य हे नग्न असते. नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे असते.ते तसे असावेच लागते. "




"मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते. "




"आईबापांच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींचा वारसा मुलांना मिळतो. तो सृष्टीचा नियमच आहे. "




"झाडाची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात ,तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. "





"सारी माणस काही मंगल आणि काही अमंगल प्रवृत्ती घेऊनच या जगात जन्माला येतात. "



"जीवनात तत्त्वज्ञान हाच मानवाचा अंतिम आधार आहे."



"बहुवचनापेक्षा  एकवचन माणसाच प्रेम अधिक चांगल्या रीतीने प्रगट करू शकत."






Bolka Sparsh





"दैव हे मोठे क्रूर मांजर आहे."




"आशाभंगासारखे  जगात दुसरे दु:ख नाही.  





"जे माणसाच्या रक्तात असत , तेच प्रत्येक वेळी वर उसळून येतं. 

No comments:

Post a Comment