अमृतवेल पुस्तकातील सर्वोत्कृष्ट विचार
मागच्या मालिकेत आपण विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या ययाती ह्या कादंबरीतील सर्वोत्तम विचार Best Quotes From yayati books हे बघितले.
आज आपण विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या अजरामर पुस्तकांपैकी एक पुस्तक "अमृतवेल" ह्या पुस्तकातील वि स खांडेकरांचे Best Quotes सर्वोत्तम विचार पाहणार आहोत. त्याआधी वि स खांडेकरांनी अमृतवेल मधील प्रीती म्हणजे काय ह्या प्रश्नाच एकंदरीत गोड अस उत्तर पुस्तकाच्या मागच्या पुष्ट्भागावर दिलेले आहे ते आपण बघुयात.
या चित्रातल्या वेलीवर नाना रंगाची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखी आहे, बाळ प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे ! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते , तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा-जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य- निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणस आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत. आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधानापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्र आहेत. पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनास झाल, म्हणजे मनुष्य केवलं इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वताचाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात...
अमृतवेल पुस्तकातील सर्वोत्कृष्ट विचार
आपल्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.
जीवन-समुद्र विशाल आहे.चित्रविचित्र आहे.जितका सुंदर, तितकाच भयंकर आहे.पण त्याला ना ऐलतीर ना पैलतीर.
मुंबईत मनुष्य माणूस असतो, तो केवळ आपल्या स्वप्नात.
बालपण म्हणजे समुद्राच्या वेळेवरच्या मऊ-मऊ वाळूत इवले-इवले किल्ले बांधण्याचा काळ.
अमंगल शंकेसारखी झपाट्याने वाढणारी विषवल्ली जगात दुसरी कुठलीही नाही.
मृत्यू कुणाचीही कदर करीत नाही. कशाचीही पर्वा बालगीत नाही.जीवनात येणारे ते आनंदी, अनंत आणि अंधळे असे चक्रीवादळ आहे!
माणसाची बुद्धी आणि त्याच्या भावना यांचा मेळ या जगात कधीच बसत नाही.
दु:ख माणसाला अंतर्मुख करते.हेच खरे! ते दुसऱ्या माणसाशी असलेले नाते अधिक स्पष्ट करते, अधिक दृढ करते.
माणसानं ओठांशी नेलेला अमृताचा प्याला नियतीला अनेकदा पाहवत नाही. एखाद्या चेटकणीसारखी ती अचानक प्रगट होते.आणि क्षणार्धात तो प्याला भोवतालच्या धुळीत उडवून देते.
भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही.
मानवाचं मन केवळ भूतकाळच्या साखळदंडानी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुडपंखाच वरदानही लाभलं आहे.
एखाद स्वप्न पाहणं , ते फुलविण , ते सत्यसृष्टीत उतरावं , म्हणून धडपडण, त्या धडपडीतला आनंद लुटण आणि दुर्दैवानं ते स्वप्नं भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्ल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांमागन धावणं , हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो, तो यामुळं!
संकोच हा सत्याचा वैरी आहे.
अनेक सुंदर स्वप्नं पृथ्वीवर उतरली, की कुरूप दिसू लागतात.
आयुष्य हा सुख- दुःखाचा पाठशिवणीचा खेळ आहे.
जीवनात स्वप्न पाहण्याचा आनंद आहे, आणि स्वप्नभंगामुळ होणारा विषादही आहे.
जन्म हे या परमशक्तीचं वत्सल्य स्मित आहे, प्रीती हे तिच मधुर गीत आहे, मृत्यू ही तिची राग व्यक्त करण्याची रीत आहे. या शक्तीची कृपा आणि कोप यांचा आपण नतमस्तक होऊन स्वीकार केला पाहिजे .
No comments:
Post a Comment