आवडतं मला....
आवडतं मला तुझं माझ्यावर रुसणं😳
आणि तुला रुसलेलं पाहून स्मितहास्य करणं😍
आवडतं मला तुला रुसलेलं बघणं
आणि रुसून तुझं माझ्याशी अबोला धरणं😯
आवडतं मला तुझी खोड काढणं
आवडतं मला तुला सारखं सारखं सतावण👻
वाट बघतो मी त्या क्षणाची
केव्हा तू माझ्याशी स्वतःहून रागवशील
अन अबोला धरून चिडीचूप होशील...😕
तुझ्या न बोलण्याने घेईल मी उसनं रागावन😢
अन करील तुझ्याबरोबर उसनी कट्टी😐
मग तू हट्टाने माझ्याकडे बोलण्याचा आग्रह करशील❤️
आवडत मला असं तुला माझ्याकडे बोलण्याचा हट्ट करताना...❤️❤️❤️
आवडत मला तुझ्याशी भांडायला
अन तुझ्या त्या रडलेल्या चेहऱ्याकडे पाहायला
आवडतं मला तुझे सोनेरी आसवे टिपायला...💕
आवडतं मला तुला माझ्यावर रागवताना
का रडवलं का रागवलंस अशी तंटा करताना💥
आवडतं मला तुझ्याकडे एकटक पाहायला😘
अन तू इकडे तिकडे बघून हळूच नजर वाकवून लाजताना😳
आवडतं मला तुला तसं पाहताना...😍😝
माहिती आहे मी तुझाच आहे
पण पाहायचं आहे मला तुला माझ्यावर हक्क गाजवताना😍😍
अन असं करत असताना पाहत राहावंसं वाटतं
फक्त आणि फक्त तुझ्या ओठांना.....💋
आवडतं मला तुला इकडे तिकडे बघताना👀
तुझे ते सुंदर डोळ्यांना वर खाली इकडे तिकडे होताना..
आवडत मला तुला रागवलेलं पाहताना
अन रागवताना लाल झालेल्या नाकाला🙅
आवडतं मला तुझ्या कानातल्या झुमक्याकडे पाहताना
कारण तू आल्याची आठवण करून देतात ते माझ्या हृदयाला...😍
हो आवडतं मला सारखं सारखं तुझ्याकडे पाहायला....💏💏
✒️📝©दिपक रिंगे
( तुमची प्रतिक्रिया माझ्या लिखाणाला महत्व देईल आवडल्यास नक्की कळवा कशी वाटली)
No comments:
Post a Comment