वि स खांडेखारांचे बहुमूल्य विचार VI
पाप आणि पुण्य या धूर्त पंडितांनी आणि मूर्ख माणसांनी प्रचलित केलेल्या काल्पनिक गोष्टी आहेत.
या जगात सुख आणि दु:ख या दोनच खऱ्या गोष्टी आहेत बाकी सर्व माया आहे.
पाप आणि पुण्य हे नुसते मनाचे भास आहेत.
उत्कट,निरपेक्ष आणि पवित्र प्रेम करणारे माणूस लाभणे हे जीवनातील परमभाग्य आहे.
आत्म्याच्या उन्नतीसाठी शरीराचे हाल करणे किंवा शरीराच्या सुखासाठी आत्म्याला बेशुद्ध करून ठेवणे हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत.
स्त्री आणि पुरुष यांचे नाते शरीर आणि आत्मा यांच्यासारखे आहे.
कुठल्याही धर्माला जीवनाचा तिरस्कार करण्याचा किंवा त्याला ज्या मुलभूत मर्यादा आहेत त्या ओलांडण्याचा अधिकार नाही.
स्वधर्माशी प्रतारणा करणे पाप आहे.
घर हे स्त्रीचे विश्व असते,पण विश्व हे पुरुषाचे घर असते.
जे आज फुलते ते उद्या कोमजते.
जे जीवन वाट्याला आलं आहे,ते आनंदात जगणं त्या जीवनातील आनंद किंवा सुगंध शोधणं,तो सर्वाना आनंदानं देण हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
यौवन हा काही केवळ वर नाही;तो एक शापसुद्धा आहे.
मनुष्य निसर्गाच्या सहवासात असला,म्हणजे जीवन आपल्या सत्यस्वरुपात त्याच्यापुढ प्रगट होते.
निसर्गापासून मनुष्य दूर गेला की त्याचे जीवन एकांगी होऊ लागते.
काही माणसांना प्रेमाच्या ओलाव्याची फार गरज असते,तो मिळाला नाही तर ती सुकून जातात.
मुले मोठी होऊ लागली की ती आईबापांपासून दूर जाऊ लागतात.
सफल न होणाऱ्या प्रेमाचे दु:ख असह्य असते.
निराशेपेक्षा खोटी आशा फार वाईट.
विकारांच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे, वासनांच्या पलीकडे, सर्व क्षणिक गोष्टींच्या पलीकडे कलेचे जग असते.
मध्याने उन्मत झालेला मनुष्य स्त्रीलंपट बनतो.
प्रेम हे एका हृदयातून उगम पावणारी आणि दुसऱ्या हृदयाला जाऊन मिळणारी महानदी आहे.
मुलांचे नशीब आईबापांच्या नशीबाशी बांधलेले असते.
No comments:
Post a Comment