यशस्वी व्यवस्थापकाने केलीच पाहिजे अशी कामे
ह्या धावत्या जगात सगळेच कोणत्या ना कोणत्या तरी व्यवसायात गुंतले आहेत आणि ती सगळ्यांपेक्षा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नांत असतात.
जगात खूप व्यवसायी माणसे आहेत जे एकसारखेच व्यवसाय करून एकमेकांसोबत प्रतीस्पर्धा करतात. आणि त्याचसाठी आज आम्ही घेऊन आलोत सगळ्यात आणि सर्वांत यशस्वी व्यवस्थापक होऊ इछिणार्यांनी केलीच पाहिजे अशी कामे .
चला तर ज्याला जगातील सगळ्यात मोठा आणि यशस्वी व्यवस्थापक व्हायचे असेल त्याने कोणकोणती कामे करणे गरजेचे आहे ते पाहूयात.
यशस्वी व्यक्ती होण्यासाठी ह्या 8 गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत.
Mission Statement : ध्येय वाक्याचा पुरवठा
जेव्हा आपण कोणताही व्यवसाय किंवा काम करायचं ठरवल तर त्यासाठी Mission ध्येय हे निश्चित ठरविले पाहिजे. आणि ते काम करताना कितीही बिकट प्रसंग आला , कितीही मोठी संकटे आली तरी आपले ध्येय सोडायचे नाही का डगमगायचे नाही.
Plan and Policies: योजना आणि धोरण
यशस्वी व्यवस्थापक बनण्यासाठी प्रत्येक व्यवस्थापकाने त्याच्या व्यवसायाबद्दल योजना बनविणे गरजेचे आहे आणि त्याच योजनांबरोबर काही धोरणे राबवली पाहिजेत. योजना बनविणे धोरण राबविणे आपले ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी योजना बनवायची आणि योजना अंमलात आणण्यासाठी धोरणे राबवायची. योजना हा ध्येयाकडे जाणारा रस्ता आहे तर धोरण हे दिशादर्शक आहे.
Organizing Resources: साधन सामग्रीची जुळवाजुळव करणे
व्यवसायासाठी योजना आणि धोरणे निश्चित केल्यानंतर व्यवस्थापकाला त्या योजनांच्या साधन सामग्रीची जुळवाजुळव केली पाहिजे. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी योजना आणि धोरणे राबवणे आणि त्यासाठी लागणारी सगळी साधनसामग्रीची जुळवाजुळव करायची. ह्यामध्ये माणसे, भांडवल, मशिन, सामग्री सगळे काही आले.
Selection: निवड करणे
व्यवसायात आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी ध्येयवाक्य निश्चित केल्यावर त्या ध्येयासाठी योजना राबवने आणि त्या योजना अंमलात आणण्यासाठी योग्य ती साधनसामग्रीची जुळवाजुळव केल्यानंतर त्या कामासाठी लागणारी योग्य माणसे अचूक पणे निवडून त्यांना योग्य ती जबाबदारी ध्यायची. Right Person to be Slected For Right Job
Direction: दिशा देणे
व्यवसायासाठी निवडलेल्या माणसांना वेळोवेळी अचूक मार्गदर्शन केले पाहिजे. ते ध्येयापासून भरकटून जाऊ नयेत याची काळजी घेणे हे एका यशस्वी व्यवस्थापकाने केलेच पाहिजे. थोडक्यात काय तर सहकाऱ्यांची दिशा चुकणार नाही याची दक्षता घेणे.
Control of Activities: कामावर नियंत्रण
व्यवस्थापनात आपले सहकारी काय काम करतात यावर नियंत्रण ठेऊन त्यांना नियंत्रित करणारी व्यवस्था निर्माण करून त्या व्यवस्थेवर ही नियंत्रण ठेऊन प्रत्येकाची कार्यकुशलता वेळोवेळी मोजणे हे एका यशस्वी व्यवस्थापकाने आपल्या व्यवसायात केलेच पाहिजे.
Motivation: प्रोत्साहन देणे
व्यवस्थापनात आपल्या सहकार्यांना नुसतं नियंत्रित करून काम भागत नसतं तर त्यांना आणखी वेगाने अचूकपणे काम करण्यासाठी प्रवृत्त करणेही महत्वाचे असते.
Reporting: अहवाल
व्यवस्थापनात कोणी काय काम केल आहे त्याचा अहवाल तयार करणं गरजेच असत जेणेकरून कोणाला प्रमोशन द्यायचे आणि कोणाची बदली करायची आणि कोणाला बडतर्फ करायचे याचा निर्णय घेता येईल.अशी व्यवस्था करणं आणि कामकाज सुरळीत योग्य दिशेन चालत आहे ना याची खात्री करून आवश्यकता असल्यास काय बदल करावे लागतील हे समजून भविष्यात तसे बदल करणे. चांगल्या माणसाचं प्रमोशन, कामचुकारांची बदली आणि निष्काळजी लोकांची बडतर्फी ही या तत्वाची त्रिसूत्री आहे.
लक्षात ठेवा आपल्या जीवनात काही तरी मिशन असणे हेच आपण यशस्वी होण्याचं प्रमुख कारण असतं, ज्यांच्या जीवनात ध्येय असते ते ध्येयासाठी, प्राप्तीसाठी जगतात. ध्येय नसणारे लोक जिवंतपनीच मेलेले असतात.
No comments:
Post a Comment