Thoughts that Inspired Everyone

Breaking

  

Find us on Facebook

Monday, January 20, 2020

वि. स. खांडेकर अमृतवेल पुस्तकाबद्दल माहिती

 वि. स. खांडेकर अमृतवेल पुस्तकाबद्दल माहिती  


Bolka Sparsh


मागच्या मालिकेत आपण विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या ययाती ह्या कादंबरीतील सर्वोत्तम विचार Best Quotes From yayati books  हे बघितले. 

आज आपण विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या अजरामर पुस्तकांपैकी एक पुस्तक "अमृतवेल" ह्या पुस्तकातील वि स खांडेकरांचे  Best Quotes  सर्वोत्तम विचार पाहणार आहोत. त्याआधी वि स खांडेकरांनी अमृतवेल मधील प्रीती म्हणजे काय ह्या प्रश्नाच एकंदरीत गोड अस उत्तर पुस्तकाच्या मागच्या पुष्ट्भागावर दिलेले आहे ते आपण बघुयात. 

या चित्रातल्या वेलीवर नाना रंगाची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखी आहे, बाळ प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे ! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साऱ्या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते , तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा-जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य- निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणस आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत. आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधानापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्र आहेत. पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनास झाल, म्हणजे मनुष्य केवलं इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वताचाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात... 

अमृतवेल ह्या पुस्तकातील विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या काही चारित्र्य (वर्ण). 

  • अलकनंदा (नंदा)
  • सुमित्रा 
  • मिलिंद
  • नंदाचे आजोबा
  • वसुंधरा 
  • दासबाबू 
  • मधुरा 
  • देवदत्त 

No comments:

Post a Comment