Thoughts that Inspired Everyone

Breaking

Find us on Facebook

Find us on Facebook
Visit our facebook page

Tuesday, January 14, 2020

वि स खांडेकरांचे ययाती कादंबरीमधील मधील मौल्यवान विचार VIII

वि स खांडेकरांचे ययाती कादंबरीमधील  मधील मौल्यवान विचार VIII


Bolka Sparsh


आपल्या वि स खांडेकरांची  ययाती  ह्या कादंबरी मधील ही शेवटची  मालेकीत (series) मी विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या काही पुस्तकातील  आणि प्रेरित केलेलं मुद्दे, वाक्य जे मला आवडलेत तेच मी तुमच्यासमोर सादर करत आहे. 


विष्णू सखाराम खांडेकर उर्फ वि स खांडेकर ह्यांची लेखणीतून सर्वानाच काही ना काही शिकायला मिळतेच आणि त्याच मुले त्यांच्या  पुस्तकांची  वाचण्याची आवड जास्त लागते . ययाती हे पुस्तक वाचताना सुद्धा माझ्याबरोबर तेच झाले, खर तर एवढ मोठ पुस्तक वाचायचं कस आणि किती दिवसात वाचणार ह्याच विचारात ते पुस्तक साधारण महिना दीड महिना घरीच पडून असायचं. कधी कधी दिवसातून रोज थोड थोड वाचन करायचो पण पुन्हा तोच विचार यायचा की एवढ मोठ पुस्तक वाचायचं कस? पण पूर्ण वाचल्यानंतर मला ह्या पुस्तकातून खूप अशे प्रेरणादायी मुद्दे सापडलेत तेच मी तुमच्याबरोबर संपादित करणार आहे.





मनुष्याचा आत्मा जितका अधिक विकसित, तितके त्याचे दु:ख अधिक. 


कुणाही व्यक्तीने सुखासाठी जी धडपड करायची असते, ती इतर व्यक्तींच्या सुखाला छेद देऊन नव्हे, तर त्यांतल्या प्रत्येकाचे सुख आपल्या सुखाइतके महत्वाचे आहे, असे मानून. 



कुठल्याही क्षणिक सुखाची चटक लागलेली सर्व इंद्रिये हट्टी मुलाप्रमाणे त्या सुखाची पुनःपुन्हा मागणी करू लागतात. 



लोभातून पाप निर्माण होते. 



हिंसा, गुन्हा, पाप या एकापुढच्या एक अशा पायऱ्या आहेत. 



पापी मनुष्य सवयीने महापातकाला प्रवृत्त होतो, महापातक माणसाला अमानुष करून सोडते. 



मनुष्य हा स्वभावातच विरागी नाही, तो भोगी आहे. प्रश्न आहे तो त्याला स्वतःच्या भोगाच्या मर्यादा सदैव कशा कळत राहतील हा!



संयम म्हणजे आपले स्वतंत्र्य गमावणे नव्हे, तर दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला अवसर देणे होय. 



मनुष्याची कुठलीही वासना, सदैव वासना या स्वरूपातच राहिली, तर तिचे उन्मादात रुपांतर होण्याचा संभव असतो.



कुत्रा हा माणसाचा अत्यंत इमानी मित्र असला, तरी तो पिसाळला म्हणजे त्याचा शत्रू बनतो.



कामवासनेचे काय किंवा दुसऱ्या कुठल्याही वासनेचे काय, मानवी जीवनात सतत वासनेच्या स्वरूपातच कायम राहणे भयप्रद आहे.



मोह आणि माया कधीही एकत्र राहू शकत नाही. माणसाला एकतर त्याला कशाचा ना कशाचा मोह लागतो नाहीतर माया तरी सोडून नाही जात.



माणसाला काही गोष्टी त्यांच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार मिळतात. 



कोणत्याही कारणाशिवाय या जगात काहीच होत नाही, ते कारण शोधलं पाहिजे.



पुरुष बोलून दाखवितात, बायका बोलून दाखवीत नाहीत; पण दोघांना एकाच सुखाची ओढ असते.



वेलीची पाने कितीही सुंदर असली तरी फुलांशिवाय तिला शोभा नाही.



पुरुष स्वभावतः आकाशाचा पूजक आहे; स्त्रीला अधिक प्रिय आहे पृथ्वीची पूजा. 

❤❤❤❤❤😍😍😍😍

मला आशा आहे की  वि स खांडेकरांचे वरील ययाती कादंबरीमधील मुद्दे तुम्हाला आवडले असतील.

अशाच भन्नाट पोस्ट आम्ही वेळेनुसार संपादित करतच राहू त्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर फोलो करा आणि आम्ही रोजच्या अद्यावत केलेल्या पोस्ट पाहत राहा.  

No comments:

Post a Comment