ययाती पुस्तकातील वि. स. खांडेकरांचे सर्वोत्तम ( वाक्य ) शब्दरचना
THE BEST QUOTES FROM THE BOOK OF YAYATI
नमस्कार मित्रवर्ग, मी सुरु विष्णू सखाराम खांडेकर सर ह्याच्या विचारांच्या मालिका सुरु केली आहे.
वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी मधील ह्या मालेकीत (Series) मी विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या काही पुस्तकातील आणि प्रेरित केलेलं मुद्दे, वाक्य जे मला आवडलेत तेच मी तुमच्यासमोर सादर करत आहे.
सध्याची मालिका (Series) पूर्णता "ययाती " ह्या पुस्तकावर आधारित आहे. मी वाचलेलं सर्वात पहिलं आणि मला माझ्या जीवनात आवडलेलं सर्वात पहिलं पहिलं पुस्तक म्हणजे " ययाती " .
मी सुरु केलेली विष्णू सखाराम खांडेकर सर ह्याच्या विचारांच्या शब्दरचनाची मालिका सुरु केली आहे. इथे तुम्ही वि.स.खांडेकर ह्यांची प्रसिद्ध वाक्य > Quotes पाहणार आहात.
आज आपण "ययाती" मधील विष्णू सखाराम खांडेकर लिखित चरित्र "देवयानी " ह्या चरित्राचे असे संवाद जे मला आवडले आहेत ते मी इथे तुमच्या बरोबर सामायिक करत आहे.आवडल्यास नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा.
THE BEST QUOTES OF YAYATI BOOK
ययाती पुस्तकातील देवयानीचे संवादामधील आवडलेली वाक्य
⬇️
जे सुंदर असत, त्याचीच पूजा जग करत.
सौंदर्याची पूजा हा स्त्रीचा धर्म आहे, ती कुठल्याही सुंदर वस्तूचा नाश करू शकत नाही.
तरुण मुलीचे मन लाजाळूच्या झाडाप्रमाणे असते.
जो घाव घालतो, त्याला तो विसरून जाणं सोप असत ; पण ज्याच्या कपाळावर घाव बसतो , त्याला त्याचा विसर पडत नाही.
मनुष्य रागाच्या आहारी गेला , म्हणजे क्रूर होतो. पशु बनतो.
बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे , पाप-पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत.एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्वसाक्षी परमेश्वर.
एखादी गोष्ट दुरून जितकी भयंकर दिसते तितकी ती खरोखर भीतीदायक नसते.
या जगात जन्मावर, जातींवर काही अवलंबून नाही.
संकटे कुणाला चुकली आहेत. उलट या जगात सज्जनांच्याच वाट्याला अधिक येतात.
जीवन नेहमीच अपूर्ण असत.तसं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे.
प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पहायची शक्ती देतं.
नि:स्वार्थी, निरपेक्ष प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते.
प्रिय व्यक्तीच्या तिच्या दोषांसह स्वीकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असली पाहिजे.
खरं प्रेम नेहमीच निस्वार्थी असत.
No comments:
Post a Comment