सांग ना होईल का भेट आपुली ह्या जन्मी?
पहाटेचा प्रकाश डोकावला खिडकीतुनी
चिमण्यांचा चिवचिवाट झाला अंगणी।
अंगणातल्या पक्षी मिले एकमेकांसनी
सांग ना होईल का भेट आपुली ह्या जन्मी?
उंच उंच डोंगरातूनी सूर्यप्रकाश डोकावला
झाडे-फुले पशु-पक्षी टवकारले अंगणी।
लाल पिवळ्या ह्या मातीचा गंध सुहासला
सांग ना होईल का भेट आपुली ह्या जन्माची?
दूर कपऱ्यातून उंचावरून वाहत निघाली नदी
नाही तिला पर्वा ह्या दगडधोंडाची कधी।
रक्त सांडवीत वळणावळणाला भेटावयास सागराला
सांग ना होईल का भेट आपुली ह्या जन्माची?
सूर्यास्तानंतर जगातील जुन्या आठवणी क्षणोक्षणी
समाधानाने पेटवू आपल्या उरल्या आयुष्याच्या मशाली
जाळून टाकू कडवट त्या आठवणी ।
घेउनी शपथ नव्या आयुष्याची मनी
सांग ना होईल का भेट आपुली ह्या जन्मी?
जसा मोर व्याकुळ पावसाच्या एका थेंबासाठी
प्रीतीचे हे हळवे मन, कासाविसले तूझ्या भेटीसाठी।
सांग ना होईल का भेट आपुली ह्या जन्मी?
ह्या दोन जीवांच्या आत्म्याच्या मनो-मिलनाची।।
...✍ ©दिपकरिंगे
No comments:
Post a Comment