Thoughts that Inspired Everyone

Breaking

Find us on Facebook

Find us on Facebook
Visit our facebook page

Thursday, August 13, 2020

Chatrapati Shivaji Maharaj Best Speech and Information

 छ.शिवाजी महाराज एक उत्कृष्ट पुढारी



Chatrapati Shivaji Maharaj Best Speech and Information


कामाची विभागणी 

शिवाजी महाराज हे एक उत्तम नेतृत्वच नव्हते तर उत्कृष्ट पुढारीही होते.ते प्रत्येक कामामध्ये किंवा प्रत्येक स्वारीवर प्रत्येकाला आप आपले काम बजावून सांगायचे आणि प्रत्येक आदेशा प्रमाणे आपल्या राजाचे काम न चुकता पार पाडायचे. आता बघायला गेले तर स्वतः शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वतःवर काही कामगिरी सोपवली होती हे एक उत्तम पुढच्याच कौशल्य आपल्या सगळ्यांना आपल्या विचारात आणलं पाहिजे.


शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभारात कशा आणि कोणत्या विभागणी पडल्या होत्या हे आपण पाहुयात :


शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभारासाठी आणि प्रशासनाच्या सोयीसाठी एकूण आठ विभाग तयार केले होते हे आपणाला माहीतच आहे. आणि त्या विभागांना आप अष्टप्रधान मंडळ या नावाने ओळखतो

प्रत्येक वेगळ्या कामासाठी वेगळा विभाग आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र असा अधिकार म्हणजे मंत्री किंवा व्यवस्थापक.(बघा किती विचार करून महाराजांनी विभाग पाडलेले सर्वांचाच विचार करून म्हणजे बघा जर महाराजांनी एकाच विभागाला जर दोन तीन मंत्री किंवा व्यवस्थापक ठेवले असते तर त्या विभागातील कामगारांमध्ये चलविचल किंवा गडबडी झाली असती एवढ्या साऱ्या व्यस्थापकांचं वेगवेगळं काम एकाच वेळी करण जड पडलं असत म्हणून महाराजांनी पुढचा विचार करून आठ वेगळे विभाग आणि प्रत्येक विभागाला त्यांचा स्वतंत्र मंत्री निवडला)

महाराजांचे हे आठ विभाग आणि मंत्र्यांची कामे खालील प्रमाणे :

१ ) मुख्य प्रधान (पेशवा) - राजपत्रावर शिक्का राजकार्य महाराजांच्या काळात मुख्य प्रधानाला पगार सालिना १५००० होन मिळत होता.


२) अमात्य - (मुजुमदार) - राज्यकारभारातील जमाखर्च, दफ्तरदार ( पदाधिकारी) व फडणवीस ( हिशोब तपासणारा ) यांच्यावर देखरेख करण्याच काम अमात्यकडे सोपवलं जायचं.- पगार सालीना १२००० होन


३) सचिव (सुरनीस) - राजपत्र विषयी सगळी जबाबदारी -पगार सालीना १०००० होन


४) सुमंत (डबीर) - परराज्याविषयक कार्याचा विचार -पगार सालीना १०००० होन 


५) सेनापती (सरनौबत) - सर्व लष्कराची जबाबदारी सेनापातीवर सोपवलेली सालाना -पगार १०००० होन


६) पंडितराय (दानाध्यक्ष) - धर्माधर्माचा विचार -पगार सालीना १०००० होन


७) न्यायाधीश - राज्यातील न्यायनिवाडा करणे -पगार सालीना १०००० होन


८) मंत्री (वाकनीस) - राज्यातील दिनचर्या लिहिणे, आमंत्रणाचा नियोजन, आणि महाराजांची भोजनाची व्यवस्था.


या सर्व मंत्र्यांना मदत करण्यासाठी नेमलेले दरकदार ( अधिकारी)

  • दिवाण,
  • मुजुमदार हिशोब तपासनीस,
  • फडणवीस महसूल हिशोब,
  • सबनीस दफ्तरदार,
  • कारखानीस पुरवठा अधिकारी,
  • चिटणीस,
  • जामदार-खजिनदार,
  • पोतनीस - नाणेतज्ञ.



टीप : ((होन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. होन वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असायचे.)



अठरा कारखाने 


महाराजांनी अष्टप्रधान मंडळ बनविले म्हणजेच काय तर प्रत्येक विभागाचे किंवा कामाचे विशिष्टीकरण केले अन विशिष्टीकरणाचा पुढचा टप्पा म्हणजे आपोआपच ते नवीनमता (innovation) ला जन्माला घालते.त्या त्या विभागाने किंवा मंत्राने त्याला दिलेले कार्य सातत्याने केल्याने तो माणूस त्या कामात निष्णात होतो.आणि त्यातूनच नवीन नवीन शोध निर्माण होतात नवीन नवीन युक्त्या जन्मला येतात यालाच म्हणतात नवीनमता (innovation).

या साठी महाराजांनी वेगवेगळे विभाग तयार केलेत:


राज्याच्या आधीन असणारे आठरा कारखाने ( state department) 

  • खजिना (कोषागार रोख पैसे)


  • जवाहिरखाना (रत्नशाळा)


  • अंबरखाना (धान्यशाळा)


  • अबदारखान (पेये)


  • नगारखाना (वाध्य)


  • तालिमखाना (व्यायामशाळा)


  • जामदारखाना (सर्व प्रकारची नाणी )


  • जिरातेखाना (शेती)


  • मुदबकखाना (पाकालय )


  • शरबतखाना (पानक)


  • शिकारखान (पक्षिशाळा)


  • दारूखाना (स्फोटकशाळा )


  • शहदखाना (आरोग्य)


  • पीलखाना (हत्तीशाळा)


  • फरासखाना (अस्तरणगार)


  • उष्टरखाना (उंटशाळा)


  • तोफखाना (यंत्रशाळा)


  • दफतरखान (लेखनशाळा)



महाराजांच्या थेट नियंत्रणात असलेले महाल (centralise डिपार्टमेंट)

  • पोते (खजिना) 


  • थट्टी (गोशाळा)

  • शेरी (मनोरंजन ,उद्यान)


  • वहिली (रथशाळा वाहनव्यवस्था )


  • कोठी (धान्यगार)


  • सौदागीर (माल)


  • टंकसाल (नाणे छपाई)


  • दरूणी (अंतपूर राणीवसा )


  • पागा( अश्व शाळा )


  • इमारत ( बांधकाम ,शिल्प)


  • पालखी (शिबिका )


  • छबिना (कायदा आणि सुविदा)







@दिपकरिंगे


नमस्कार मित्रहो हि माहिती खरी असून मी हि माहिती माझ्या वाचलेलया पुस्तकातून एकत्रित करून तुमच्यासमोर सादर करत आहे आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल अन त्यांच्या पुढारी (leadership ) बद्दल कुणाला ठीकस माहित नसावं म्हणून हा छोटासा प्रयत्न.


हि माहिती मी जगप्रसिद्ध लेखक प्राचार्य नामदेवराव जाधव यांच्या शिवाजी द मॅनेजमेंट गुरु ह्या पुस्तकातून न्याहाळी आहे.


No comments:

Post a Comment