Thoughts that Inspired Everyone

Breaking

Find us on Facebook

Find us on Facebook
Visit our facebook page

Wednesday, January 1, 2020

नियोजन कसे करायचे आणि त्यासाठी कोणती काळजी घ्याल ?

नियोजन कसे करायचे आणि त्यासाठी कोणती काळजी घ्याल ?




Bolka Sparsh
How to make Planning in Marathi 





    नियोजन कसे करायचे आणि त्यासाठी कोणती काळजी घ्याल ?



    मागच्या पोस्ट मध्ये आपण नियोजन म्हणजे काय आणि ह्या बद्दल पाहिले तर त्यामध्ये आपण नियोजन म्हणजे अशी तयारी जी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करते की आपण कुठे जायचे आहे आणि कसे जायचे आहे याची सुरुवात होते ती आपण कोठे आहोत येथून.

    तर साध्या भाषेत आपण नियोजनाची व्याख्या सुद्धा पहिली होती ती अशी
    आपण अगोदरच याचा निर्णय घ्यायचा की ते विशिष्ट कोणते काम करायचे करायचे आहे , कसे करायचे आहे, कधी करायचे आहे, आणि ते कोण करणार आहे.

    थोडक्यात काय तर काम करायचे ते काम कोणी करायचे , कसे करायचे आणि कधी करायचे हे advance मध्ये ठरवणे म्हणजेच नियोजन. 

    र आज आपण नियोजन करताना कोणती काळजी घ्यायची हे पाहणार आहोत.
    चला तर आपण आज नियोजन करताना कोणती काळजी घ्यायची हे क्रमाक्रमाने पाहू.





    सुटसुटीत आणि सोपं: Simplicity


    नियोजन असं असावं की ते साध्या माणसालाही सहज कळून आले पाहिजे. त्या नियोजनातील Facts आणि Figure व्यवस्थित दिल्या दाखविता आल्या पाहिजेत जेणेकरून काय तर ज्याने नियोजन अंमलात आणायचे त्या व्यक्तीला ते नियोजन व्यवस्थित कळले पाहिजे.
    नियोजन बनविणारे ते साधे सुटसुटीत बनविले आणि तेवढ्याच साधेपणाने जर अंमलबजावणी करणारा समजावले तर नियोजन पूर्णपणे यशस्वी होते. चांगली योजना असून जर ती व्यवस्थीत कळली नाहीतर त्या योजनेचा बोजवारा उडून सगळे नुकसान होऊ शकते.





    लवचिकता: Flexibility 


    नियोजन कधीही कठोर नसावे Plan must not be rigid. नियोजन कधीही लवचिक असले पाहिजे. जेणेकरून जर काही आवश्यकता निर्माण झाली तर त्यात ताबडतोब काही बदल करता आले पाहिजेत. 
    नियोजन करतानाची परिस्थिती आणि अंमबीजवणीची वेळ यात जर अचानक काही तफावत येऊ शकणारी स्थिती निर्माण झाली तर त्या दुरूस्तीसाठी जागा असावी याला म्हणतात लवचिकता.





    योग्यता: Suitability 


    चांगले नियोजन त्यालाच म्हणावे जे ज्या कामासाठी बनविले आहे त्यासाठी योग्य असले पाहिजे. म्हणजे काय तर साधन सामग्री आणि लोकांची क्षमता पाहूनच ध्येय निश्चित केले पाहिजे. म्हणजे काय तर Over Targeting किंवा Under Targeting हे दोन्ही टाळले गेले पाहिजे.





    स्वीकार: Acceptance 


    तुम्ही जे नियोजन करायला घ्याल ते नियोजन आपल्या हाताखालील लोकांना स्विकारता येईल असे पाहिजे त्यामुळे नियोजन करतानाच सहकाऱ्यांशी विचार विनिमय करूनच ध्येय किंवा टार्गेट ठरविले गेले पाहिजे किंवा नियोजन करणाऱ्या व्यक्तीला ते अंमलबजावणीतून सहभागी असणाऱ्यांना समजवता आले पाहिजे.





    जुळवाजुळव: Facilitate Organising


    एक चांगल नियोजन आपल्याला साधन सामग्रीची जुळवाजुळव करण्याची शक्ती देते किंवा क्षमता अंगी बनवते.त्यामुळे नियोजन करण्याच्या अनुभवी प्रक्रियेत माणसाला अडचणी येत नाहीत किंवा त्या फारच कमी येतात. मग ती भौतिक साधन असोत की मनुष्यबळ असो. म्हणजेच काय तर नियोजनानुसार आणि नियोजनामुळे आपल्याला योग्य माणसं आणि साधने यांची जुळवाजुळव करण्यात यश येते.





    दिशा देणे: Provide Direction


    योग्य नियोजन आपल्याला दिशा देते. कारण नियोजन एक नकाशाप्रमाणे आपले मार्गदर्शकाचे काम करते. वेळ काळ दिशा सगळं काही आपल्याला माहीत असल्याने सगळं काही व्यवस्थीत होते.


    Bolka Sparsh



    नियंत्रण करता येतं: Facilitate Control


    एक चांगल्या नियोजनामुळे कार्यावर चांगले नियंत्रण करता येते. आपलं नियोजन ठरलेलं असतं त्याप्रमाणे आपण अंमलबजावणीसाठी ताकद लावतो आणि त्याप्रमाणे कामकाजाच मूल्यमापन केलं जातं जेणेकरून नियोजन आणि अंमलबजावणी यातील फरक आपल्याला मोजता येतो आणि त्याप्रमाणे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती नियंत्रणाची प्रक्रिया राबविता येतं. 
    थोडक्यात काय तर, योग्य काम योग्य दिशेने योग्य प्रमाणात होत नसेल तर ते वेळेत आवरणे म्हणजेच नियंत्रण. आणि हे चांगल्या हे चांगल्या नियोजनामुळेच शक्य होते.





    संघभावना: Harmony Generation


    एका चांगल्या नियोजनामुळे लोकांचे चांगले संबंध निर्माण होऊन त्यांच्या मध्ये एक चांगली अशी संघभावना निर्माण होते. कारण नियोजन म्हणजे फक्त एकत्र येणं नसते तर एकत्र चालणं आणि एकत्र पोहोचणंही असतं आणि सर्वांच्या एकजिनसीपणावरच ध्येयाची प्राप्ती होते. कारण हा एकट्या माणसाचा खेळ नाही. 





    कार्यक्षमता निर्माण होते : Generate Efficiency


    एक चांगलं नियोजन माणसाला आपल्याकडे असलेल्या साधन सामग्रीचे सर्वात चांगले उपयोग करायला शिकवते आणि त्याच वेळी खर्च आणि नुकसान कमीत कमी ठेवण्यात सक्षम बनविते.





    लोकांना प्रेरणा मिळते: Motivate People


    एक चांगलं नियोजन हे नेहमी वास्तवदर्शी आणि आव्हानात्मक असतं. म्हणजेच काय तर एक चांगलं नियोजन करणाराच कसब पणाला लावलं तर अंमलबजावणी करणारी शौर्य , बुद्धिमत्ता, धाडस सगळं काही पणाला लागत असतं आणि असं आव्हानात्मक कामच सहकर्यांना प्रेरणा देण्याचं काम करत असतं.


    नियोजनामुळेच मोठमोठी कामे हाती घेतली जातात आणि अशा जागतिक कीर्तीच्या उपक्रमामध्ये काम करायला लोकांना आवडतं कारण यातून त्यांना नाव,पैसा, प्रसिद्धी आणि समाधान सगळं काही मिळण्याची शक्यता असते. आणि जेव्हा माणसाला या चारही गोष्टी मिळणे शक्य वाटतं तिथंच माणसे हात घालतात. कारण प्रेरणा ही त्या मागची किल्ली असते.


    Source of Information: शिवाजी द म्यानेजमेंट गुरु

    No comments:

    Post a Comment