जी नदी तहानेने व्याकुळ झालेली मनुष्याची तृष्णा शांत करते, तीच तो पुढे खोल पाण्यात गेला की त्याचा प्राण घेते.
जगण्याची दुर्दम इच्छा आणि त्याकरिता चाललेली प्राणिमात्राची धडपड हा मानवाला मिळालेला निसर्गाचा वारसा आहे.
धर्म आणि अधर्म हा भेद निसर्ग करीत नाही तो केवळ मनुष्यच करू शकतो.
आईच हृदय हे जगातल्या सर्व तत्वज्ञानाचं माहेरघर असतं.
जे मोकळ्या मुठीने आपले सर्वस्व देते, ते खरे प्रेम!
ज्याचा आत्मा मुक्त असतो, तोच या जगात ईश्वराचं दर्शन घेऊ शकतो.
ज्याचा आत्मा स्वार्थाच्या वासनांच्या आणि मोहांच्या आहारी जातो, तो मनुष्य या जगात सदैव दास्यात खितपत पडतो.
माणसाला परमेश्वराशी जोडणारा अतिशय जवळचा पण अत्यंत अवघड असा त्यागाचा मार्ग असतो.
आपल्या मनाची दारे आणि खिडक्या बंद करणे अवघड असले तरी अशक्य नसते.
स्वप्नात काय हवे ते दिसते माणसाला.
स्त्रीचे मन शब्दाच्या काथ्याकूट करीत बसत नाही . ते फक्त त्या शब्दाच्या मागे असलेली भावना पाहते.
जी प्रियकराकरिता कुठलंही दिव्य करू शकते , तीच खरी प्रियसी.
एका क्षणी माणसाचा मित्र असलेले दैव पुढच्या क्षणी त्याचा शत्रू बनतो.
माणूस हा देव आणि राक्षस यांचा किती विचित्र संकर आहे.
प्रेम म्हणजे प्रिय व्यक्तीवरून आपले प्राण हसतमुखानं ओवाळून टाकणारी मनाची उत्कटता.
मृत्यू हे जीवनातील भयंकर रहस्य आहे.
जेव्हा वासनेला उपभोगाची चटक लागते तेव्हा त्याच्यामागे ती वेड्यासारखी धावत सुटते.
वासनेला केवळ स्वतःचे समाधान कळते.
No comments:
Post a Comment