Thoughts that Inspired Everyone

Breaking

Find us on Facebook

Find us on Facebook
Visit our facebook page

Friday, January 3, 2020

सावित्रीबाई फुले जयंती 2020

वाचा  जिने स्वतःचं संपूर्ण आयुष्य स्त्रियांसाठी, शिक्षणप्रसारणासाठी , समाजकल्याणासाठी समर्पण केले अशा रणरागिणीला संघर्ष 



Bolka Sparsh









    ज्ञानज्योती, समाजसेविका आणि शिक्षणप्रसारक 

    सावित्रीबाई फुले ज्यांनी अनेक संघर्ष करत शिक्षण प्रसाराचा नारा पूर्ण जगभरात पसरवला ज्यांनी सनातन समाजाचा विरोध पत्करला अंगावर शेणाचा मारा केला तरी मागे हटल्या नाहीत तर काही उन्मत्तानी अंगावर हात टाकण्याचा घाणेरडा प्रयास केला तरी त्याला घाबरल्या नाहीत का डगमगल्या नाहीत आशा महान समाजसुधारक,शिक्षणप्रसारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे खंडोजी नेवासे पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला.सावित्रीबाई या खंडोजी पाटलांचे पहिले कन्यारत्न या पहिल्या कन्यारत्नामुळे नेवासे पाटलांना आभाळ गगनमय झाल.या आनंदाच्या भरात नेवासे पाटलांनी संपूर्ण गावाला साखर वाटली.या क्रांतीचे बारसे खूप धुमधडाक्यात झाले आणि ती वेळ आली या जनकल्याण आणि समाजसुधारक क्रांतीचे नाव ठेवण्याची आणि नाव ठेवले "सावित्री" . सावित्री हे नाव ठेवण्यामागे एक व्यापक भूमिका होती.भारतीय समाजात सत्यवान सावित्रीची कथा सर्वानाच अवगत आहे .पुराणातल्या या सावित्रीने आपल्या पतीच प्राण वाचवण्यासाठी यमाशी भिडलेली. परुंतु या आधुनिक सावित्रीने हजारो वर्षांपासून मनरूपी यमाच्या पाशात अडकलेल्या लाखो करोडो भारतीय स्त्रियांना अज्ञान,रूढीपरंपरा,पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलामगिरीतून मुक्त केल्याच आपण पहिले आहे. पुराणातल्या काल्पनिक सावित्रीने फक्त आपल्या पतीचे प्राण वाचवलेले पण या आधुनिक सावित्रीने धर्माच्या, अंधरूढीच्या पाशात, गुलामीत अडकलेल्या, दलितांना, समाजाच्या उन्मत्त विचारांना मुक्त केले स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना त्यांचे अधिकार पटवून दिले.त्यामुळे या आधुनिक सावित्रीचा समाजात सन्मान झाला पाहिजे.तिच्या विचारणा घरात रोज पुजले पाहिजे.

    सावित्राबाईंचे बालपण अगदी आनंदात गेले.लहानपणापासूनच सावित्रीबाई जिद्दी,धाडसी,अन्यायाविरुद्ध,शोषणाविरुसिद्ध बंड पुकारणाऱ्या आणि स्वाभिमानी होत्या.या गुणांमुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे त्यांना स्वतःच्या जीवनाचे समरांगण करावे लागले हे त्या धैर्याने सामोरे गेल्या. इथेच त्याने निडरतेचा पाठ शिकवला.महात्मा फुले यांच्या जी संकटे आली त्या संकटाना एक आदर्श शिक्षिका, एक कर्तृत्ववान पत्नी म्हणून सामोरे गेल्या.एकी स्त्री एकाच वेळी अनेक भूमिका निडरतेने करू शकते हे त्यांनी दाखवले आहे.आयुष्यभर शिक्षण, समानता,ममता,न्याय,या मानवी मूल्यांसाठी झगडत राहिल्या.अशा धाडसी कर्तृत्ववान सावित्रीबाईंचा विवाह इ. स. १८४० साली ज्योतिराव फुल्यांशी झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षाचे होते.सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.


    शिक्षण प्रवास  


    लग्नाअगोदर सावित्रीबाईंना शिक्षणाचा गंधही नव्हता.सासरी गेल्यानंतर काही वर्षातच ज्ञानाचा सुगंध संपूर्ण भारतात पसरविण्याचे महान कार्य केले.म.फुले यांच्यासारखा विचारकारक,जाणकार,शिक्षणाची प्रचंड ओढ असलेला कर्तृत्वान असलेल्या महापुरुषाबरोबर सावित्रीबाईंचा विवाह झाला.महात्मा फुले यांच्या शिक्षनावर धर्माच्या काही ठेकेदारांमुळे विराम लागला होता.ते त्यांनी पुन्हास घेण्यास सुरु केले हे कार्य करत असतानाच आपल्या पत्नीनेही शिक्षण घ्यावं असं ज्योतीबांना मनोमने वाटे.परुंतु त्या काळात मुलींना शिकण्यासाठी शाळा नव्हत्या.ख्रिश्चनांनी सुरु केलेल्या शाळा राजकीय आयोगाने मोडीत काढल्या.ख्रिश्चनांनी सुरु केलेल्या शाळा हिंदू धर्म बुडवण्यासाठीच काढल्या आहेत असा खोडसाळ, तर्कवितर्क मोर्चा प्रचार सुरु केला.त्यामुळे आयोगाने शाळा बंद केल्या.इथल्या सर्व घडामोडी ईश्वर आणि धर्माशी जोडलया गेल्या.समाजात सर्वत्र अज्ञानाचा अंधरूढी परंपरेचा अंधार पसरला होता.आशा परिस्थितीमध्ये म.फुलेंना अज्ञानाचा पसरलेला अंधाराला प्रकाशात बदलवायचे होते,माणसातील पशुत्व नष्ट करायचे तर ज्योतिबा फुलेंना मुलींच्या शाळेची आवश्यकता वाटू लागली."घरातली एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुरक्षित होते हे महात्मा फुलेंनी ओळखले होते म्हणून सावित्रीबाईंना मलयामधील काळ्या मातीत क, ख, ग, घ,न गिरवायला लावले.शिक्षण हा मानवी विकासाचा मूलभूत पाया आहे हा फुल्यानी जाणले होते.म्हणून फुल्यानी सावित्रीबाईंना शिक्षरुपी अमृत पाजायचे ठरवले.त्याप्रमाणे कृती केली त्यामुळे सावित्रीबाईंना आपल्या आदर्श व महत्वकांक्षी पतीचे विचार आणि भावना समजून घेता आल्या. ज्योतिबांनीही शिक्षणामुळे सावित्रीबाईमधील मनुष्यत्व जागृत केले. त्यांच्याकडे एक माणूस म्हणून पहिले.अशा परस्पर विश्वासातून म. फुले व सावित्रीबाईंनी १८४१ पासून शिक्षणाच्या पवित्र कार्यास सुरुवात केली.ज्योतीबांनी सावित्रीबाईंना मिसेस मिचेल यांनी सुरु केलेल्या नॉर्मल स्कुल(छबिलदासवाडा, पुणे) मध्ये परीक्षेसाठी नेले.तेथे सावित्रीबाईंचे अंकगणित,बाराखडी आणि इतर विषयांच्या ज्ञानाची तपासणी केली.आणि पुढे तिसऱ्या इयतेत(१८४५- ४६) व चौथ्या इयत्तेत (१८४६- ४७) प्रवेश घेतला.पुढे शिक्षकी पेशाचे प्रशिक्षण पूर्ण केले.


    Bolka Sparsh



    इ. स. १८४८ साली भिडेवाड्यात फुलेंनी मुलींची पहिली शाळा सूरु केली. या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिकेचे कार्य केले.पुढे ह्याच शाळेत मुख्याद्यापक म्हणून कार्य केलं.सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५(40-45) पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.१८४८ ला महारवाड्यात मुलींच्या शाळेत कार्य केलं.१८४९ ला उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांच्या शाळेची स्थापना करून अध्यपनाचे काम केले..१८४७-१८४८(1847-1848) साली केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या.या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामुळे गोविंदराव फुले यांनी १८४९ ला ज्योतिबा आणि सावित्री बाईंना घरातून बाहेर काढलं.१८५१ साली बुधवारपेठेत चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली तेथेही कार्य केले.घरातून बाहेर हाकलूनही ज्योतिबा आणि सवित्रीबाई आपले शैक्षणिक आणि सामाजिक कार्य थांबवत नाहीत त्यामुळे म. फुलेंना कायमच संपविण्यासाठी १८५६ साली त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला. १८७३ ला काशीबाई या ब्राम्हण विधवेचा मुलगा यशवंत याला दत्तक घेऊन वारसपुत्र बनविला.१८७३- ७७ मध्ये दुष्काळग्रस्तांसाठी ५२ अन्नछत्रालये काढून सर्वाना अन्नदान केले.


    समाजकार्य

      
    शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

    जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत.

    केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

    इ.स. १८९६(1896) सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.


    काव्यसंग्रह


    १८९२ साली म.फुले यांच्या महानिर्वाणानंतर सावित्रीबाईंची "बावन्नकशी सुबोध रत्नाकर" हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.या काव्यसंग्रहात सावित्रीबाईंनी ज्योतिरावांकडून शिक्षणाची आणि समाजकार्याची प्रेरणा कशी मिळाली,त्यानं बहुजनांच्या विकासासाठी,सुधारणेसाठी केलेला त्याग इत्यादींचे चित्रंण या काव्यातून केले आहे तसेच ज्योतिराव आणि सावित्रीबाई या दाम्पत्याची विचारश्रीष्टी, जीवनसृष्टी आणि समर्पित जीवनाचे दर्शनही या काव्यातून घडते .ज्योतिरावांनी सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण केली त्याबद्दल सावित्रीबाईंनी कृतज्ञेतेचे विलोभनीय दर्शन त्यांच्या "बावन्नकशी सुबोध रत्नाकर"या काव्यसंग्रहातून केले आहे .

    'जयाचे मुळे मी कविता रचते
    जयाची कृपे ब्रह्म आनंद चित्ते
    जयाने दिली बुद्धीही सावित्रीला
    प्रमाण करते मी यती जोतिबाला '

    ज्यांच्यामुळे सावित्रीबाई कविता करू शकल्या,ज्यांच्यामुळे त्यांना ब्रम्हानंद झाला,ज्यांनी कविता रचण्याची बुद्धी दिली ते दुसरे तिसरे कोणी नसून ते फक्त जोतिबाचा आहेत.त्यामुळे त्या ज्योतीबांना प्रथम प्रणाम करतात.

    सावित्रीबाईंची निसर्ग कविता :

    सावित्रीबाईंनी काव्याच्या प्रांतात निसर्गविषयक कविता लेखनाला पहिल्यांदा सुरुवात केली.या निसर्गविषयक कवितेत दोन्ही काव्यसंग्रहात एकूण सात कवितांचा समावेश होतो.त्यात 'पिवळा चाफा', 'जाईचे फुल', जाईची कळी', 'गुलाबाचे फुल', 'फुलपाखरू', 'फुलांची कळी', ''मानवसृष्टी आणि मातीची ओवी'.या विविध कवितेतून सावित्रीबाईंनी निसर्गातील फुलांचे मानवी जीवनातील महत्व स्पष्ट केले आहे.

    'पिवळा चाफा
    नेत्र नासिका
    रसिक मनाला
    तृप्त करुनि
    मरून पडतो'

    पिवळा चाफा या कवितेतील चाफा हा सृष्टीचा दागिना आहे हे सांगतानाच पिवळ्या रंगाचे,गंधाचे,गुणाचे, त्यागाचे महत्व सांगून तो कवयत्रींच्या मनात शिरून काव्य करण्यास कसा प्रवृत्त करतो तसेच तो मानवाच्या पंचेद्रियाला कसे तृप्त करतो आणि शेवटी नष्ट होतो याचे वास्तव्य दर्शन या कवितेत आले आहे.

    जायचे फुल हि रूपक प्रधान कविता आहे या कवितेत मात्र मानवी प्रवृत्तीवर नेमकेपणाने बोट ठेवण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले आहे.

    फुल जाईचे
    पाहत असता
    ते मज पाही
    मुरका घेऊन //१//
    रीत जगाची
    कार्य झाल्यावर
    फेकून देई
    मजला हुंगून //२//

    निसर्गाचा अनेक वस्तूंचा उपयोग आपण करतो आणि आपले काम संपले कि त्याला फेकून देतो हि जी मानवी प्रवृत्ती आहे त्यावर सावित्रीबाई अचूकपणे बोट ठेवतात.

    'गुलाबाचे फुल' या कवितेत गुलाबाचे फुल आणि कण्हेरीचे फुल यांचा आकार आणि रंग जरी सारखे असले तरी गुणवैशिष्ट्ये भिन्न आहेत तसेच डोंबकावला आणि राजहंस हे जरी पक्षी असले तरी दोघांच्या जगण्यामध्ये,गुणांमध्ये वेगळेपण पाहायला मिळते.

    'गुलाबाचे फुल आणि कण्हेरीचे
    स्वरूप दोघांचे एक दिसे //१//
    डोमकावळा तो नसे राजहंस
    कृष्ण आणि कंस दुजे असे'//२//

    'फुलपाखरू व फुलांची कळी' या कवितेत सावित्रीबाईं निसर्गातील घटनांचे चित्रण करतात हि कविता समाजातील पुरुषांच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकते.या कवितेच्या पहिल्या चरणात फुलपाखराचे वर्णन केले आहे. दुसऱ्या चरणात कळीचे वर्णन करून कळी अन फुलपाखरू हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात याचे वर्णन केले आहे.कळीने फुलपाखराची वाट पाहणे,फुलपाखराने येऊन कळीमधील मध शोषून घेणे, तिची चव घेणे आणि शेवटी तिला फेकू दुसऱ्या कळीकडे जाणे हि जशी फुलपाखराची प्रवृत्ती आहे. या कवितेच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी पुरुषांच्या प्रवृत्तीचे चित्रण या रूपकामधे केले आहे.

    चव घेऊनी करी दूर ती
    तिजकडे ते जरा न पाही
    तिला टाकुनी दुसरीकडे
    जावयास त्या लाजही नाही
    कोण कोठली कळी फुलांची
    जुनी विसर नवीन पाही
    रीत जगाची उत्स्रुंखलाही
    पाहुनिया मी स्तिमित होई'.

    'मानव व सृष्टी आणि मातीची ओवी' या दोन्ही कवितांत निसर्गाचे वर्णन केले आहे. पहिल्या कवितेत पाऊस पडल्यानंतर शिवारात जो बदल होतो याचे वर्णन आहे तर दुसऱ्या कवितेत शेतीची महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.शेतात वेगवेगळ्या रंगाची माती असते हि माती मानवाला अन्नधान्य,फळेफुले देते. या मातीचा माहिमचा सावित्रीबाई या कवितेत गातात.
    धरतीची माती, रंगेबेरंगी ती
    काळी पांढरी ती, शिवारात
    काळसर माती, पीकपाणी देती
    फुले फळे शोभती, शिवारात.

    या कवितेत निसर्गातल्या विविध घडामोडी,फुले,फळे ,अन्नधान्य,पीकपाणी, भ्रमर या सर्वांचा उल्लेख करतात.निसर्ग हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक असल्यामुळे त्याचे मानवी जीवनातील स्थान कवितांतून स्पष्ट होते.


    निधन


    इ.स. १८९६-९७(1896-97) सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.


    Bolka Sparsh


    सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७(1876-77) च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७(1897) मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.
    ह्या अशा रणरागिणीला माझा सलाम जिने स्वतःचं संपूर्ण आयुष्य स्त्रियांसाठी, शिक्षणप्रसारणासाठी , समाजकल्याणासाठी समर्पण केले.

    No comments:

    Post a Comment