वि.स.खांडेकर ह्यांची प्रसिद्ध वाक्य > Quotes
ययाती पुस्तकातील विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या आवडलेल्या ओळी
ययाती पुस्तकातील विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या आवडलेल्या ओळी |
ययाती पुस्तकातील विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या मनाला स्पर्श करणारे बोलके शब्द मी तुमच्या बरोबर आज संपादित करत आहे .
The Best Quotes from yayati Book
विष्णू सखाराम खांडेकर उर्फ वि स खांडेकर ह्यांची लेखणीतून सर्वानाच काही ना काही शिकायला मिळतेच आणि त्याच मुले त्यांची पुस्तके वाचण्याची आवड जास्त लागते . ययाती हे पुस्तक वाचताना सुद्धा माझ्याबरोबर तेच झाले, खर तर एवढ मोठ पुस्तक वाचायचं कस आणि किती दिवसात वाचणार ह्याच विचारात ते पुस्तक साधारण महिना दीड महिना घरीच पडून असायचं कधी कधी दिवसातून रोज थोड थोड वाचन करायचो पण पुन्हा तोच विचार यायचा की एवढ मोठ पुस्तक वाचायचं कस?
The Best Quotes from "YAYATI" Book
हळू हळू पुस्तकातील प्रेरणादायी शब्द आणि त्यांची वाक्यरचना, लिहिण्याच कौशल्य आणि शुद्ध मराठी शब्द ह्या सगळ्यामुळे माझी मराठी वाचनाची आवड खुपच वाढत गेली. आणि ह्याच सगळ्यामुळे मला वाचनाबरोबर वही - पेन घेऊन बसण्याची सवय जडली आणि मला आवडणारी वाक्य रचना माझ्या वहीमध्ये साठवून ठेवायला लागलो.
The Best Quotes From "YAYATI" Book
जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे, पण कर्तव्य ही तिच्यापेक्षा श्रेष्ठ अशी भावना आहे.
कर्तव्याला कठोर व्हावं लागत पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे.
कुठला ना कुठला छंद हे दु:खावरले फार गुणकारी औषध आहे.
माणसाचा खरा वैरी देव नाही तो माणूसच आहे.
काळ बदलतो, पिढ्या पालाटतात, पण माणसे ती कधीच बदलत नाहीत.
प्रीती हा कोणत्याही भीतीतून किंवा दु:खातून मुक्त होण्याचा एक सहज सुलभ मार्ग आहे.
तरुण्यातून पाऊल टाकले , की प्रेमाचा अनुभव प्रत्येकाला येऊ लागतो.
जर तुम्हाला माणसाच्या पोटात घुसायचे असेल तर तुम्हाला त्याच्या हृदयावर तुमचे स्थान पक्के करायला हवे.
स्वतःसाठी पूजेत दंग असलेली माणसे नकळत मनाने अंधळी आणि हृदयाने बहिरी असतात.
स्वतःसाठी दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहण्यात अपूर्व आनंद असतो.
पुरुषाचे डोळे पाहिले की तो कामुक आहे, की नाही हे झटकन स्त्रीला कळते.
ज्या पुरुषाच्या डोळ्यात कामुकतेची लालसा नसते स्त्रियांना असलेच पुरुष आवडतात.
जे पुरुष स्त्रियांच्या पाठीमागे लागतात त्यांना पाठ फिरवतात आणि जे त्यांच्याकडे पाठ फिरवतात स्त्रिया त्यांच्याच पाठी लागतात.
डोळ्यात अश्रू येणे हे दुबळ्या मनाचे लक्षण आहे.
विचारांच्या सहायाने विकारांवर विजय मिळविण्यातच खरा मनुष्यधर्म आहे.
कुणाचही दु:ख असो , ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे, तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहोत,अशी कल्पना करणं हा!
तरुण स्त्रीला नुसती नवऱ्याची बायको होऊन चालत नाही, त्याची मैत्रीण, त्याची बहिण ,त्याची मुलगी , फार काय ,प्रसंगी त्याची आईसुद्धा व्हावं लागत तिला!
माणसाला कधीकधी जीव नकोसा होतो आपला किंवा दुसऱ्याचा.
आत्मा जेव्हा शरीराच्या द्वारा आपलं अस्तित्व दर्शिवतो,तेव्हाच त्याचा जगाला साक्षात्कार होऊ शकतो.
मनुष्य हा निसर्ग आणि ईश्वर यांच्यातला सर्वश्रेष्ठ दुवा आहे.
वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी मधील ह्या मालेकीत मी विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या काही पुस्तकातील आणि प्रेरित केलेलं मुद्दे, वाक्य जे मला आवडलेत तेच मी तुमच्यासमोर सादर करत आहे.
सध्याची मालिका पूर्णता "ययाती " ह्या पुस्तकावर आधारित आहे. मी वाचलेलं सर्वात पहिलं आणि मला माझ्या जीवनात आवडलेलं सर्वात पहिलं पहिलं पुस्तक म्हणजे "ययाती " .
मी सुरु केलेली विष्णू सखाराम खांडेकर सर ह्याच्या विचारांच्या शब्दरचनाची मालिका "तुम्ही वि.स.खांडेकर ह्यांची प्रसिद्ध वाक्य > Quotes" ह्या विषयावर पाहणार आहात.
वि.स.खांडेकर ह्यांचे असे काही तथ्य विचार (facts) जे तुम्हाला प्रभावित करतील. ते तुम्ही वि.स.खांडेकर ह्यांची प्रसिद्ध वाक्य > Quotes ह्या सेरीज मध्ये पाहणार आहोत.
आज आपण ययातीमधील विष्णू सखाराम खांडेकर लिखित चरित्र "ययाती" ह्या चरित्राचे असे संवाद जे मला आवडले आहेत ते मी इथे तुमच्या बरोबर सामायिक केले आहेत . आवडल्यास नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा.
No comments:
Post a Comment