Thoughts that Inspired Everyone

Breaking

Find us on Facebook

Find us on Facebook
Visit our facebook page

Tuesday, December 10, 2019

Inspirational and Motivational Thoughts in Marathi

Inspirational and Motivational Thoughts in Marathi 





Bolka Sparsh



भावना ओंजळीत घेऊन नका जगू त्या व्यक्त करण्यात मजा आहे डोळ्यांत अश्रू नेहमीच येतात ते पुसून हसण्यात मजा असते.

माणूस पर्वतावरून पडून पुन्हा उठू शकतो मात्र एखाद्याच्या नजरेतून पडल्यावर तो उठू शकत नाही.

स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा त्याचे स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.

रात्री शांत झोप येणे साधी गोष्ट नसते त्यासाठी संपूर्ण दिवस मेहनत करावी लागते.

प्रकाश रोकठोक असतो लपवालपवीचा खेळ फक्त आंधरापाशी असतो. अंधार आणि आतल्या गाठीची माणस सारखीच.

कोरड्यात पेटन्यासाठी काहीही नसेल तेव्हा पेटलेली काडी सुद्धा स्वतःहून विझून जाते.


Bolka Sparsh


जो पर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये वादळ आहे , भावनांना फुलांचा गंध आहे. तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे .

ईश्वराने आपल्याला काहीतरी ध्यावे यासाठी मंदीरात जाऊ नये तर देवाने बरेच काही दिले म्हणून मंदीरात जावे.


यशस्वी होण्याचा मार्ग कधीही सोपा नसतो  जितका मार्ग अवघड तितके मोठे यश.


कोणाचीही सध्याची परिस्थिती पाहून त्याची टर उडवू नका कारण  काळ इतका ताकदवान आहे की  तो एका सामान्य कोलशाल्याही हळूहळू हिरा बनवतो 


समजून सांगणे आणि समजून घेणे यात खूप फरक आहे वेळ आली की समजून सांगणारे भेटतात पण वेळेवर समजून घेणारे नसतात.

आपल्यासाठी कुणी नसेल तरी आपण सर्वांसाठी आहोत ही गोष्ट फुलांकडून शिकावी.

समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं चांगल वागता येईल तितकं चांगल वागा आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दु:खी  होणार नाही याची काळजी घ्या.
Bolka Sparsh

गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसने या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच.

जगातील शक्तिशाली महासत्ता उलथवण्याची ताकद स्त्रीच्या सौंदर्यात आहे.

माणसाला दुसर्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघायला , दखल द्यायला आवडत. हा मानवी मानशास्त्राचा सिद्धांत आहे.

स्वतःचा हट्ट दुसऱ्याच आयुष्य भंग करत असेल तर हट्टावर नियंत्रण यायला हवं.

समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्यालाच नेहमी अन्याय सोसावा लागतो.

Bolka Sparsh


माणूस हा समजशील प्राणी आहे , समाजाशिवाय तो राहू शकत नाही. आपलं दु:ख भावना त्याला व्यक्त करायच्या असतात . त्यासाठी त्याला हक्काचं माणूस लागतो.

माणूस म्हणतो पैसा आला की, मी काहीतरी करेल . पैसा म्हणतो तू काहीतरी कर मगच मी तुझ्याकडे येईल.

आपला हट्ट तोडण्याची ताकद एकातच आहे  परिस्थिती.

कोणतीही वस्तू चांगली वा वाईट नसते आपले विचार तिला तसे रूप देतात.







No comments:

Post a Comment