वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी मधील थोडक्यात माहिती
वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी मधील शब्दवाक्य |
नमस्कार मित्रवर्ग, मी सुरु केलेली विष्णू सखाराम खांडेकर सर ह्याच्या विचारांच्या मालिका सुरु केली आहे.
सध्याची मालिका पूर्णता "ययाती " ह्या पुस्तकावर आधारित आहे. मी वाचलेलं सर्वात पहिलं आणि मला माझ्या जीवनात आवडलेलं सर्वात पहिलं पहिलं पुस्तक म्हणजे " ययाती " .
वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी ह्या पुस्तकामध्ये वि स खांडेकर ह्यांनी जे चरित्र रेखाटले आहेत आणि त्यांचं जीवन हे खरच खूप मनापासून आवडलं. "ययाती" मधील प्रत्येक पान चालताना मनामध्ये खूप खुश व्हायचो की पुढे काय होईल म्हणून.
"ययाती" मधील काही मला आवडलेली चरित्र आणि त्याची नावे खालीलप्रमाणे :
ययाती
देवयानी
शर्मिष्ठा
यती
शुक्राचार्य
कच
ययाती :
वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी मध्ये ययाती हा लहाणपणापासुन स्वप्नात रमणारा, सौदर्यांचा वेडा, फुलांचा व त्याचा गंधाचा त्याला हव्यास होता. कोणी फुल आणुन दिली की तो त्यांचा मनसोक्त सुगंध घ्यायचा. तो शुर होताच पण त्याही पेक्षा कामुक, लंपट ज्याला स्वप्नातही संयम ठेवता येत नाही असा होता.
त्याला प्रेम पाहिजे असते पण ते नेमके कसे तेच त्याला कळत नाही आणि त्याच्या शोधात तो पुर्ण आयुष्य घालवतो त्याला कधीही वृध्द बनायचे नसते सदैव चिरतरूण राहु इच्छितो, परंतु काहि घटनांमुळे त्याला आयुष्याच्या अंती जाणवत की ही सारी भोगवृत्ती जीवनासाठी उपयुक्त नसते.
देवयानी :
वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी मध्ये देवयानी ही एक ॠषीकन्या. अहंकारी, महत्वाकांक्षी, तिचे खरे प्रेम कच वर असते पण कचला फक्त त्याचे कार्य महत्वाचे वाटते व तो तिला नाकारतो.
त्या प्रेमभंगातच ती ययातीचा स्वीकार करते पण त्यातही असफलच ठरते कारण ती अहंकारामुळे ययातीची सखी बनु शकली नाही, ययातीच्या लंपट स्वभावाला हीच कारणीभुत ठरते कारण जे सौख्य ययातीला पाहिजे असते ते ती देण्यास प्रत्येक वेळी नकारते. तीही त्याचा द्वेष करत राहते. अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली अशी ही वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी मधील "देवयानी ".
शर्मिष्ठा :
"शर्मिष्ठा" ही खरी राजकन्या परंतु देवयानीच्या अहंकारामुळे व काही घटनेमुळे शर्मिष्ठाला देवयानीची दासी म्हणुन राहावे लागते. त्याच दरम्यान शर्मिष्ठा व ययाती ह्यामध्ये सख्य होते. ययातीला ज्या प्रेमाची गरज असते तेच प्रेम शर्मिष्ठा कडुन मिळते. परंतू जेव्हा देवयानीला ते कळते तेव्हा ती तिचा वध करु इच्छिते पण ययाती तिला वाचवुन सगळ्या पासुन दुर जाण्यास सांगतो.
स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी अशी ही वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी मधील "शर्मिष्ठा ".
कच :
"कच" हा देवांचे गुरू बृहस्पतीचा पुत्र होय. दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांनी संजीवनीविद्येच्या बळावर दैत्यराजा वृषपर्वा यास देवांचा युद्धामध्ये वारंवार पराभव करण्यास सहाय्य केले. देवांचा राजा इंद्र याने कचास शुक्राचार्यांचा शिष्य होऊन त्यांच्याकडून संजीवनीविद्या शिकून घेण्याच्या कामगिरीवर पाठवले. एका अलौकीक घटनाक्रमामुळे देवयानी हिच्या आग्रहामुळे शुक्राचार्यांना कचास संजीवनीविद्या शिकवणे भाग पडले त्यामुळे देवतांचा विजय होतो.
विचारी, संयमी व ध्येयवादी असा वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी मधील "कच".
ही कादंबरी ययाती ची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment